नाशिक : सिन्नर तालुक्यातील इटर्निस फाइन केमिकल्स लि. (Eternis Fine Chemicals Ltd.), मुसळगाव, ता. सिन्नर, जि.नाशिक कंपनी व्यवस्थापन आणि युनियन संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार संपन्न झाला. कंपनीतील कामगारांचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष आमदार सुहास आण्णा कांदे महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना करते.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालील प्रमाणे -
कालावधी : सदर करार पासून तीन वर्षासाठी (1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2025) करण्यात आला आहे
पगारवाढ : सीटीसी रु.10,700/- पगार वाढ करण्यात आली.
विमा : कामगारांना सहकुटुंब 24 तास संरक्षण असलेली विमा पॉलिसी दोन लाख रुपये कव्हर असलेली पॉलिसी देण्यात आली, कामगारांचा कंपनीत किंवा बाहेर कोठेही अपघात झाला तर दहा लाख रुपये अपघात विमा पॉलिसी देण्यात आली.
कर्ज : कामगारांना कंपनीच्या फंडातून बिनव्याजी 1 लाख 25 हजार कर्ज देण्याचे ठरविण्यात आले.
पुरस्कार : कामगारांच्या मुलांसाठी जे मुलं दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन यामध्ये - 60 टक्के, 70 टक्के, 80 टक्के आणि 90 टक्के असे गुण प्राप्त करतील त्या मुलांना शैक्षणिक भत्ता म्हणून कंपनी कंपनीच्या खर्चातून पुरस्कार देऊन सत्कार करेल
बोनस : कामगारांना दिवाळी सणाचा बोनस डीए बेसिक मिळून 20 टक्के बोनस देण्याचे ठरविले
सदर करारवेळी कंपनी व्यवस्थापनच्या वतीने एल जी पुत्रण (जनरल मॅनेजर कार्पोरेट), विलास नाठे (सीनियर मॅनेजर एचआर अँड एडमिन), रघुनाथ (मेहत्रे सीनियर मॅनेजर प्रोडक्शन) तसेच कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस रवी देवरे, चिटणीस फरान खान, सदस्य प्रदीप साळवे, मोहन लहाने, योगेश लोंढे उपस्थित होते.
कामगार विषयक पुस्तके मिळविण्यासाठी - क्लिक करा