एस जी एल कार्बन इंडिया प्रा.लिमी.(SGL Carbon India Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

रांजणगाव, पुणे : येथील एस जी एल कार्बन इंडिया प्रा.लिमी.(SGL Carbon India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि एस जी एल कार्बन इंडिया कर्मचारी संघटना यांचे मध्ये वेतनवाढीचा करार दि. ८ जून २०२२ रोजी संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ठ्ये :

करार कालावधी : माहे एप्रिल-२०२२ ते मार्च- २०२५ या तीन वर्षासाठी राहील 

पगार वाढ : एकूण पगार रु.२१,०००/- 
प्रथम वर्ष - रुपये ७,०००/-
दुसरे वर्ष - रुपये ७,०००/-
तिसरे वर्ष -  रुपये ७,०००/-

या वाढीव पगारांपैकी ५०% रक्कम मूळ पगारात समाविष्ठ करण्याचे मान्य झाले. 

या व्यतिरिक्त पूर्वी मिळत असलेल्या सेवा शर्ती, फायदे तशाच पुढे चालू राहतील .

    करारावर व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक विवेक माहेश्वरी, फायनान्स हेड सुमित तावरी व एच आर बसब देवघोरीया आणि संघटनेच्या वतीने अध्यक्ष भास्कर तेरदाळे, उपाध्यक्ष सोमनाथ सूर्यवंशी, जन. सेक्रेटरी गणपती हनमापूरे, खजिनदार सोमनाथ मदने, सह सेक्रेटरी पवन बनोरे यांनी व इतर सदस्यांनी सह्या केल्या. 

    हा करार यशस्वी होण्यासाठी कामगार नेते रामचंद्र शरमाळे व विवेक कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. ह्या करारामुळे कामगारांमध्ये अत्यंत आनंदाचे व उत्साही वातावरण पसरलेले आहे.