मुंबई : पुणे, बारामती, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे 4000 वीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यां व अन्य विषयाबाबत काल दि.9 जून रोजी मंत्रालयात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सोबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेची बैठक झाली. पश्चिम महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांच्या बदल्यांना त्यांनी अंतिम स्थगिती दिली अशी माहिती कामगार संघ यांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी मंत्री तनपुरे यांनी या कष्टकरी कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सूचित केले.
पैश्याची मागणी वेतनात कपात या समस्यां सोडवण्यासाठी संघटना प्रतिनिधी व प्रशासनाने यावर एकत्र बसून एक महिन्यात यावर उपाय योजना करावी. कंत्राटदार विरहित सेवा घेण्याबाबत संघटनेच्या मदतीने कंपनीचे पैसे वाचत आहेत यातून कामगारांना जॉब सिक्युरिटी मिळेल व त्यांचे पगार डायरेक्ट कामगारांच्या बँक खात्यात जमा होतील. यावेळी संघटनेच्या वतीने मंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार सुप्रिया ताईं सुळे यांचे आभार मानण्यात आले. या बैठकीसाठी अण्णाजी देसाई, निलेश खरात, उमेश आनेराव, राहुल बोडके, सागर पवार संतोष अंबाड, राजू आव्हाड उपस्थित होते.