चाकण : जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त निल मेटल्स प्रोडक्टस लिमिटेड म्हाळुंगे चाकण आणि कामगार कल्याण मंडळ चाकण यांच्या संयुक्त विद्यमानाने निल मेटल प्रॉडक्ट लिमिटेड म्हाळुंगे चाकण येथे दि. 5 जून 2022 रोजी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षरोपणामध्ये चिंच, निब, गुलमोहर, अशोक तसेच काही औषधी वनस्पती मिळून जवळ जवळ शंभर झाडे लावण्यात आली. याप्रसंगी निल मेटल प्रॉडक्ट लिमिटेड युनिट हेड मिलिंद जठार, एच आर हेड संजय भसे, श्रीधर सुकाळे, काळूराम रेटवडे, महेश उबाळे, सचिन कानडे, संतोष हांडे तसेच कामगार संघटना प्रतिनिधी संतोष पवार, नवनाथ नाईकनवरे त्याचबरोबर कामगार कल्याण मंडळातर्फे केंद्र संचालक अविनाश राऊत, दत्तू आढारी यांनी हजर राहून वृक्षारोपण केले.
सर्व कामगार व कर्मचारी यांनी वृक्षारोपण करण्यापूर्वी पर्यावरण संवर्धन करण्यासाठी स्वतःचा वाढदिवसादिवशी कारखान्याच्या आवारामध्ये झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर पुढे कोणत्याही कामासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करणार नाही व दुसऱ्यांना करून देणार नाही अशी शपथ घेतली आहे. कंपनीतर्फे पुढे भविष्यामध्ये देखील औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.