मेक अल्टे इंडिया प्रा. लिमि. (Mecc Alte India Private Limited) येथे दुसरा वेतनवाढ करार संपन्न

तळेगाव ढमढेरे :येथील मेक अल्टे इंडिया प्रा. लिमि. (Mecc Alte India Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि मेक अल्टे इंडिया कामगार संघटना यांच्यामध्ये दुसरा वेतन वाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक 1 जून 2022 रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :

कराराचा कालावधी : तीन वर्ष असेल (दि. 1 एप्रिल 2021 ते दि. 31 मार्च 2024)

पगार वाढ  : एकूण पगार वाढ रुपये 16,000/- सिटीसी एवढा  झाला आहे.
प्रथम वर्ष : रू 6750/-
दुसरे वर्ष : रू 4050/-
तिसरे वर्ष : रु 2700/-

पर्सनल इंसेंटिव स्कीम : रु 1000/-

उत्पादक वाढ : दहा टक्के (मॅन्युअल ऍक्टिव्हिटी)

फरक रक्कम : 31 मार्च 2022 पर्यंत रुपये 71,000/- एक रकमी देण्याचे मान्य करण्यात आले.

बोनस : बोनस व एक्स ग्रेशिया बोनस कायद्यानुसार देण्याचे ठरले.

मेडिक्लेम : रुपये एक लाख + एक लाख बफर प्रत्येकी देण्याचे मान्य करण्यात आले. 

मॅटर्निटी : रुपये 25 हजार कायम ठेवण्यात आली.

लिव्ह :
सिक लिव्ह :मध्ये 2 ने वाढ करण्यात आली - 9
कॅज्युअल लिव्ह :मध्ये 1 ने वाढ करण्यात आली - 8

जी पी ए : रुपये 15 लाख कायम ठेवण्यात आले.

जीटीए : रुपये 20 लाख कायम ठेवण्यात आले.

कॅन्टीन : चालू असलेल्या सुविधा मध्ये आठवड्यातून एक वेळ अंडाकरी ची वाढ करण्यात आली. व थर्ड शिप सुटल्यानंतर थर्ड शिफ्ट साठी सकाळी सात वाजता नाष्टा सुरू करण्यात आला.

स्मृतिचिन्ह : दहा वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना स्मृतिचिन्ह देण्याचे ठरले.

स्पोर्ट क्लब : वर्षातून एकदा कंपनी अंतर्गत क्रिकेट स्पर्धा भरण्याचे मान्य करण्यात आले. शिफ्ट सुटल्यानंतर कामगारांना खेळण्यासाठी बुद्धिबळ व कॅरम बोर्ड उपलब्ध करून देण्याचे ठरले.

     करार करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने फायनान्स हेड राम कुलकर्णी, एच आर आय आर हेड असलम परवेज, इंजीनियरिंग हेड विपिन पाटील, प्रोडक्शन हेड नंदगिरीकर, कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष सागर नरके, उपाध्यक्ष शहाजी बोदगे, ज.सेक्रेटरी अजित बारस्कर, सेक्रेटरी विनोद आहेर, खजिनदार रोहिदास परांडे, सह खजिनदार प्रदीप बोराडे, सदस्य गणेश चौधरी उपस्थित होते.

    करार यशस्वी होण्यासाठी कामगार नेते, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, उपाध्यक्ष राजू अण्णा दरेकर, रमेश सातपुते (माजी सरपंच सणसवाडी), जनरल सेक्रेटरी अविनाश वाडेकर, गणेश जाधव, राजाराम शिंदे, डीएम गायकवाड यांचे सहकार्य लाभले.