महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना तर्फे कामगार दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आणि कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ज्यांनी त्याग केला आणि बलिदान दिले अशा हुतात्म्यांचा विसर पडून देऊ नका - मीनाताई पंडित

पुणे : महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना पुणे जिल्हा रविवार  दि.१ मे २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्त श्री समर्थ मंडळ हॉल,पुणे.येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीनाताई पंडित प्रदेश उपाध्यक्ष होत्या. प्रमुख पाहुणे अमित कंक आणि सोणालिताई परदेशी उपस्थित होते.

    या वेळी मान्यवरांच्या हस्ते घरेलु महिला कामगारांना संघटना ओळख पत्र, शासकीय नोंदणी केलेल्या पावत्यांचे वाटप करण्यात आले. अमित कंक यांनी संघटना असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अतिशय चांगले काम करीत असल्या बद्दल सर्व संघटना कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शहर अध्यक्ष स्वातीताई डिसोझा यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटना करीत असलेल्या कामाची  माहिती दिली. जिल्हा अध्यक्ष उषाताई जाधव यांनी शासकीय योजनांची महत्त्वाची माहिती दिली.


    मीनाताई पंडित यांनी आपल्या भाषणात १ मे महाराष्ट्र दीन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्व सांगताना महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती करिता १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि १९६० साली महाराष्ट्र  राज्याची निर्मिती झाली.याचे स्मरण केले पूर्वीच्या काळी कामगारांना कमी मोबदल्यात जास्त काम करून घेतले जायचे, सुट्टी मिळत नसायची, कोणत्याच सुविधा मिळत नसत या अन्यायाविरुध्द आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगारांची चळवळ उभी राहिली व कामगार संघटनांची निर्मिती झाली १ मे १८९१ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर १ मे हा कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली, सर्व क्षेत्रातील कामगारानीआपल्या पूर्वजांनीआंदोलने, मोर्चे, केलेले अथक परिश्रम घेतले याचे कधीही विस्मरण होऊ देऊ नये असे सांगितले तसेच या वेळी कर्तव्य फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थिती राहून कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेछा दिल्या. निरली जाधव यांनी आभार व्यक्त केलं.या मेळाव्यास,सुजाता गुंजाळ, सुनिता बढे, वर्ष ताडे, उषा मोहिते, राजश्री महाडेश्वर, वनिता इवरे, रुपाली सुतार, जनाबाई कुडले, शीला तांदळे, रुपाली घुले, नसरीन शेख तसेच महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.