मुंबई : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेचा ९१ वा वर्धापनदिन नुकताच दि.२८.०४.२०२२ रोजी अत्यंत उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी नुकत्याच १९.०४.२०२२ रोजी गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्याचा मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या शुभहस्ते शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाचे प्रमुख लिपिक आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते अविनाश दौंड यांना पुरस्कार मिळाला.
त्याबद्दल कामगार नेते अविनाश दौंड यांचा मुद्रणालयीन संघटना कार्यालयात शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयानचे संचालक रुपेंद्र मोरे, मुद्रणालयाचे व्यवस्थापक मनोज वैद्य, कामगार कल्याण अधिकारी सुजाता कोंडविलकर यांनी विशेष सत्कार केला. या प्रसंगी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय चव्हाण, सरचिटणीस सुनिल रासम, लिपिक वर्ग संघटनेचे अध्यक्ष संतोष डोके, सरचिटणीस बाळासाहेब तुरुंबाडकर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास शेलार, सरचिटणीस गिरिराज गायकवाड आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यवर्ती संघटना कार्यालयात अविनाश दौंड यांना सन्मानित केले.