इगतपुरी : येथील औद्योगिक वसाहतीमधील महिंद्रा आणि महिंद्रा लि . इगतपुरी (Mahinda and Mahindra Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना युनियन यांच्यामध्ये गुरुवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला .
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
- एकूण पगार वाढ : रु. १४,३५१/-
- कराराचा कालावधी : साडेतीन वर्ष राहील (दि.10/03/2022 ते दि. 09/09/2025पर्यंत)
- कामगारांना सरासरी प्रति महिना रू. १४३५१/- ची भरघोस वेतन वाढ मिळाली असून त्यावर आधारित बोनस व ग्रॅच्युइटी वरील रू. १४३५१/- मध्ये समाविष्ट नसून ते अतिरिक्त असेल . सेवाजेष्ठतेनुसार कमाल वेतन रू. ७६ हजार इतके मिळणार आहे.
- या व्यतिरिक्त सेवानिवृतीनंतर शिल्लक आजारी रजा या पूर्णपणे रोखीत रूपांतरीत करता येतील.
- याशिवाय प्रतीवर्षी अतिरिक्त दोन भरपगारी रजा या सारख्या गोष्टींचा अतिरिक्त समावेश करण्यात आलेला आहे.
सदर करावेळी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी तर्फे श्री.के.जी.शेणॉय सिनियर हाईस प्रेसीडेंट ऑटो सेक्टर, श्री.विजय नायर व्हाईस प्रेसीडेंट इम्प्लॉयी रिलेशन,श्री. संजय क्षीरसागर मॅन्युफॅक्चरिंग हेड चाकण आणि इगतपुरी,श्री. राजेश खानोलकर प्लान्ट हेड इगतपुरी, श्री.टॉम थॉमस कांदीवली प्लांट हेड, श्री.संदीप गिजरे सिनियर मॅनेजर एम्प्लॉई रिलेशन इगतपुरी,श्री. आदित्य दिक्षित अकौंटस् हेड, श्री.सयाजी जाधव प्लांट इंजिनियरींग, श्री.राजेंद्र शेवाळे उत्पादन विभाग प्रमुख तसेच
भारतीय कामगार सेनेतर्फे खासदार श्री.अरविंदजी सावंत अध्यक्ष भारतीय कामगार सेना ,श्री. प्रकाशजी नाईक चिटणीस, श्री.दिलीप जाधव चिटणीस एम. टी. एन. एल., इगतपुरीचे नगराध्यक्ष श्री. संजय इंदुलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमख श्री.निवृत्ती जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्री. सुनील रोकडे तसेच स्थानिक युनिट पदाधिकारी अध्यक्ष श्री. भगवानजी आडोळे, चिटणीस श्री.अर्जुन भोसले, उपाध्यक्ष श्री. तुकाराम गाढवे, श्री. सहचिटणीस रोहिदास चौधरी, श्री.खजिनदार रमेश अहिरे, श्री.राजेंद्र कदम, श्री.प्रदीपसिंग राजपूत, श्री.सुनिल यादव उपस्थित होते.