लिओनी वायरिंग सिस्टिम्स पुणे प्रा लि. ( Leoni Wiring Systems Pune Pvt. Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पिरंगुट :-  येथील औद्योगिक वसाहतीमधील  लिओनी वायरिंग सिस्टिम्स पुणे प्रा लि. ( Leoni Wiring Systems Pune Pvt. Ltd. ) कंपनी व्यवस्थापन आणि लिओनी वायरिंग सिस्टिम्स एम्प्लॉईज यूनियन (भारतीय मजदूर संघ संलग्न) पिरंगुट यांच्यामध्ये शांततेच्या वातावरणात वेतनवाढ करार संपन्न झाला.

      जागतिक महामारीमुळे औद्योगिक क्षेत्रात ओढावलेल्या बिकट परिस्थितीतुन जात असताना यामध्ये वाहन उद्योगसुद्धा प्रभावित झालेला आहे. अशातच वाहन उद्योगासाठी सुटेभाग पुरविणा-या कंपन्यासमोरील अधिकच समस्या आहे. लिओनी वायरिंग सिस्टिम्स पुणे प्रा.लि. वायरिंग हार्नेस उत्पादन करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. इलेक्ट्रीक वाहनांचे वाढते प्रमाण, इलेक्ट्रिक चीप ची कमतरता , कच्चा माल मधील झालेली भाववाढ , व्यावसायिक स्पर्धा, ग्राहकाकडील कमी झालेली मागणी यामुळे व्यवसायावर परिणाम झालेला असतांना देखील अशा परिस्थितीत लिओनी वायरिंग सिस्टिम्स पुणे प्रा. लि. कंपनी व्यवस्थापन आणि लिओनी वायरिंग सिस्टिम्स एम्प्लॉईज यूनियन पिरंगुट यांच्यामध्ये शांततेच्या वातावरणात वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

  • एकूण पगार वाढ :   रु. 11200/-

  • कराराचा कालावधी :   32 महिने (दि.01/05/2021 ते दि. 31/12/2023 पर्यंत)

  • वाढीव पगाराचा फरक : वेतनकरार 01 मे 2021 मार्च 2022 पर्यंत चा फरक देण्यात येईल.

  • 1) जे कामगार नाईट शिफ्ट मध्ये काम करतील त्यांना नाईट शिफ्ट अलाउन्स 40 रु. देण्यात येणार आहे.

  • 2) आज पर्यंत कामगारांना बोनस हा CTC मधून देण्यात येत होता तो आता या करारा नुसार वाढीव पगारातून बोनस कटिंग बंद करण्यात आले 

    

    या करारावर व्यवस्थापनाकडून एच आर मॅनेजर बिस्वजित घोष  तसेच प्रॉडक्शन मॅनेजर वैशाली ढोबळे यांनी तर यूनियन च्या वतीने भारतीय मजदूर संघांचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच महाराष्ट्र औद्योगिक कामगार संघाचे प्रमुख ( शासनाच्या किमान वेतन सल्लगार मंडळाचे सदस्य ) सुधाकर पाटील आणि भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय उद्योग प्रभारी चंद्रकांत अण्णा धुमाळ यांनी तसेच लिओनी वायरिंग एम्प्लॉईज यूनियन चे अध्यक्ष नितीन मोहिते, उपाध्यक्ष प्रिती जगताप (कदम), सहउपाध्यक्ष  महेंद्र पाटील, जनरल सेक्रेटरी विनोद मद्रेवार, जॉईंट सेक्रेटरी सत्वशिला मोरे, सहजॉईंट सेक्रेटरी  सिमरन वाटवानी, खजिनदार सुहास भोसले यांनी सह्या केल्या.

      युनियन प्रतिनिधींची अभ्यासपुर्ण मांडणी, व्यवस्थापनाचा सकारात्मक दृष्टीकोन आणि कामगारांनी दाखविलेला संयम आणि विश्वास यामुळे हा करार पुर्ण करण्यासाठी यूनियन कमिटी ला सहकार्य मिळाले.