हायर अप्लायंसेस इंडिया प्रा.लि. (Haier Appliances India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील हायर अप्लायंसेस इंडिया प्रा.लि. (Haier Appliances India Pvt Ltd)   कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटना यांच्या मध्ये  चौथा वेतन वाढीचा करार दि. १०/०३/२०२२ रोजी यशस्वीरीत्या व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. 

कराराची ठळक वैशिष्ट्ये : 

१) पगार वाढ : प्रत्येक कामगाराला प्रत्यक्ष १४,०००/- रूपयांची पगार वाढ आणि अप्रत्यक्ष १६,०००/- रुपयांची भरघोस पगारवाढ  करण्यात आली आहे. (कामगारांचा वाढलेला पी एफ ६९०/-  ग्रॅज्युटी २७७/- आणि मेडिक्लेम २५०/- हे १४,०००/- च्या वरती कंपनी भरणार आहे)

२) करार कालावधी : हा करार ३६ महिन्यांसाठी असेल दि. १ एप्रिल २०२१ ते दि. ३१ मार्च २०२४  या कालावधीसाठी असणार आहे.
पहिल्या वर्षी  - रुपये ९,१००/-
दुसऱ्या वर्षी - रुपये २,८००/- 
तिसऱ्या वर्षी  - रुपये २,१००/- अशी वाढ असणार आहे.

३)  मेडीक्लेम पॉलिसी :  रु.५,००,००० (पाच लाख) वरून रु.६,००,०००/- (सहा लाख) करण्यात आली आहे .सदर पाॅलिसीत स्वतः कामगार,पती/पत्नी, ०२.अपत्य  आई, वडील आणि ज्यांचे आई, वडील, नाहीत त्यांचे सासू, सासरे यांचा समावेश असेल. 

४) कामगाराचा मेडीकलेमचा हप्ता कंपनी भरेल यातून कंपनीने रु ८५०/- प्रत्येक कामगारा मागे दरमहा आर्थिक ओझे घेतलेआहे.

५) वैयक्तीक अपघात विमा : हा कंपनीच्या GPA  पॉलिसी प्रमाणे रु. १५ लाख व GTLI पॉलिसी प्रमाणे रु. १० लाख राहील.

६) मेडिकल चेक-अप : वर्षातून १ वेळेस  होईल.

७)  रजा : सी.एल.- ०७ दिवस, एस.एल.-१० दिवस, पी.एल :- १५ दिवस, पितृत्व  रजा-५  दिवस,  वियोग रजा ५ दिवस ही रजा कामगाराच्या कुटुंबातील सदस्य पत्नी, मुले, भाऊ बहीण, आई व वडील, आजी व आजोबा, सासू व सासरे) मरण पावल्यास त्यांच्या अंतविधीसाठी किंवा दशक्रियेसाठी दिली जाईल 

८)  साठवणुक : पी.एल.- ६० रजा साठवता येतील

९) रजा रोखीकरण : ६० च्यापुढे  पूर्ण पगारावर  रोख दिले जातील, परंतु वर्षभरात ७ सी.एल. आणि १० एस एल घेणे  बंधनकारक आहे,

१०) गणवेश आणि सुरक्षा शुज : दरवर्षी एप्रिल महिन्यात गणवेशाचे २ ड्रेस दिले जाईल.व त्याचबरोबर २ वर्ष्याला १ जर्किंग दिला जाईल, तसेच  सुरक्षा शुजचा १ जोड व २ जोडी पायमोजे  दिले जाईल.  

११) पगारी सुट्या : ११ तसेच पगारी सुट्टी जर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आल्यास ती सुट्टी व्यवस्थापन आणि संघटना यांच्यात चर्चा करून इतर दिवशी देण्यात येईल.

१२)  कॅन्टीन : कॅन्टीन सुविधा  चालू आहे ( दिवसाला १८ रुपये ) तशीच राहील यामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही आहे

१३) सॅलरी ऍडव्हान्स :  रुपये ५०,०००/- वरून वाढून रु.१,००,०००/- करण्यात आली आहे ते बिनव्याजी  राहील

१४) फॅमिली डे : कौटुंबिक स्नेह संमेलन वर्षातुन एकदा चालू प्रथेप्रमाणे चालू राहील 

१५) मृत्यू सहाय्य निधी : दुर्दैवाने एखघा कामगाराचा मृत्यु झाल्यास युनियन कामगार एक दिवसाचे बेसिक वेतन त्याांच्या वारसांना देण्यात येईल तसेच कंपनीच्या GTLI/GPA पॉलिसी चेफायदे मिळतील

१६) सहल : वार्षिक सहल ही चालू प्रथेप्रमाणे राहील याच्या मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही

१७) अल्प सुट्टी : कामगाराना  वैयक्तिक किंवा  घरगुती अडचणी (घरातील सदस्याचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास किंवा तात्काळ दवाखान्यात भरती करण्याची गरज असल्यास) आल्यास महिन्यातून  एकदा विभाग प्रमुखच्या परवानगीने अर्धा दिवस सुट्टी मिळेल.                

१८) सेवा भत्ता (Long Service Award) : खालील प्रमाणे देण्यात येईल.
१० वर्ष सेवेसाठी - ०७ ग्राम गोल्ड कॉईन (२२ कॅरेट)
१५ वर्ष सेवेसाठी - १० ग्राम गोल्ड कॉईन (२२ कॅरेट)
२० वर्ष सेवेसाठी - १५ ग्राम गोल्ड कॉईन (२२ कॅरेट)

१९) मुलीच्या जन्माचे स्वागत : मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कंपनीने रुपये १०,००० /- ची पॉलिसी नवीन जन्मलेल्या मुलीच्या नावे करून देईल. सदर लाभ करार कालावधी साठी पहिल्या दोन आपत्ती साठीच व मुलींसाठीच असणार आहे

२०) मुलांचे कौतुक : शाळेत चाांगले  मार्क मिळवलेल्या  किंवा क्रीडा  क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या मुलांचा कंपनीकडून सत्कार किंवा गुणगौरव करण्यात येईल .

२१) महिन्याचा मोबाईल खर्च : कंपनी सर्व कामगारासाठी त्याांच्या प्रति महीना रुपये १४९/- + टॅक्स प्रति महिन्याचा पोस्टपेड प्लॅनचा खर्च देईल. या प्लॅन मध्ये इंटरनेट व कॉलिंग चा समावेश असेल.

२२) फरक : हा करार १ एप्रिल २०२१ पासून सुरु होऊन ३१ मार्च २०२४ रोजी संपणार आहे. या करारावर सह्या मार्च २०२२ मध्ये होत आहेत. म्हणून एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या अकरा महिन्याचा पहिल्या  वेतन वाढीच्या रकमेचा फरक कामगाराांना देण्यात येईल. सदर पगारवाढीचा फरक हा एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यन्तच्या प्रत्येक महिन्याच्या प्रत्यक्ष पगारावर काढण्यात येईल व ते देण्यात येईल.

   सदर वेतनवाढ करारामध्ये कंपनी कडून पंकज चावला (प्लांट हेड), मनीष सिंग (एच आर डायरेक्टर ), संचिता कुमार (प्लांट एच आर हेड), बी.रमेश (रेफ फॅक्टरी हेड), अंकलेश महाल्ले (सिनिअर मॅनेजर आय आर) तसेच युनियन कडून नरेन्द्र तांबोळी (उपाध्यक्ष ; महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) युनिट प्रतिनिधी उमेश पवार (उपचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना), सचिन जाधव, रोहिदास गुरव, गजानन सुर्यवंशी, अनिल लोणकर, मिथुन गोरुले या सर्वांनी करार यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका घेतली.