मास्किओ गास्पारदो इंडिया कामगार संघटनेचा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुणे : मास्किओ गास्पारदो इंडिया प्रा.लिमि. (Maschio Gaspardo India Pvt. Ltd.) कारेगाव एमआयडीसी रांजणगाव ता. शिरूर या कंपनीमध्ये मास्किओ गास्पारदो इंडिया कामगार संघटनेला १६ मार्च २०२२ रोजी सहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनी व्यवस्थापना समवेत कामगार संघटनेचा वर्धापन दिन उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. 

    यावेळी कंपनीचे एमडी मंगेश कटारिया, प्लांट ॲड मॅन्युअल व एच.आर. संदीप कुंभार यांनी मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनेच्या वतीने प्रास्तविक सुरेश बगाटे (अध्यक्ष) यांनी केली व दिगंबर जाधव (खजिनदार) यांनी युनियन वाटचाल व कंपनीहित हेच कामगार हित त्याबाबत विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास सर्व HOD तसेच संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी रामदास खैरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.