जी के एन सिंटर मेटल प्रा.लि. (GKN Sinter Metal Pvt. Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

अहमदनगर : येथील औद्योगिक वसाहतीमधील  जी के एन सिंटर मेटल प्रा.लि. (GKN Sinter Metal Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि  अहमदनगर  वर्क्स युनियन, अहमदनगर यांच्यामध्ये शांततेच्या वातावरणात वेतनवाढ करार संपन्न झाला.

      जागतिक महामारीमुळे औद्योगिक क्षेत्रात ओढावलेल्या बिकट परिस्थितीतुन जात असताना यामध्ये वाहन उद्योगसुद्धा प्रभावित झालेला आहे. अशातच वाहन उद्योगासाठी सुटेभाग पुरविणा-या कंपन्यासमोरील अधिकच समस्या आहे.  जी के एन सिंटर मेटल प्रा.लि. सुटे भागाचे उत्पादन करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. इलेक्ट्रीक वाहनांचे वाढते प्रमाण, इलेक्ट्रिक चीप ची कमतरता , कच्चा माला मधील झालेली भाववाढ , व्यावसायिक स्पर्धा, ग्राहकाकडील कमी झालेली मागणी यामुळे व्यवसायावर परिणाम झालेला असतांना देखील अशा परिस्थितीत  जी के एन सिंटर मेटल प्रा.लि. (GKN Sinter Metal Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि  अहमदनगर  वर्क्स युनियन, अहमदनगर यांच्यामध्ये शांततेच्या वातावरणात वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

  • एकूण पगार वाढ :   रु. 19,100/-

  • कराराचा कालावधी :   3 वर्षे (दि.01/04/2021 ते दि. 31/03/2024 पर्यंत)

  • वाढीव पगाराचा फरक : वेतनकरार फरकापोटी रु.1,52,400/- एवढी रक्कम देण्यात येईल.

  • 1) जे कर्मचारी दिनांक 1 एप्रिल 2021 नंतर कायम होतील त्या सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन वाढ देण्याचे मान्य केले. त्याची 20% टक्केवारी  ठरवण्यात येईल.

  • 2) कायझेन बक्षीस : चांगल्या कायझन व आयडिया मॅनेजमेंट साठी योग्य ते बक्षीस देण्यात येईल.

  • 3) LTA :  240 हजर दिवसानंतर प्रती दिन 5 रुपयाची वाढ झाली. 305 दिवस भरल्यानंतर 325 रुपये वाढ झाली आहे.

  • 4) प्रत्येक वर्षी PL रजा 5 वेळा ऐवजी 6 वेळा घेता येईल.

  • 5) PL  रजा किरकोळ रजेप्रमाणे उपभोगता येतील. परंतु यासाठी SL व CL या रजा  संपलेल्या असणे आवश्यक आहे.

  • 6) PL च्या पात्र दिवसांसाठी हजर दिवसांमध्ये सी ऑफ चा समावेश करण्यात येणार आहे.

  • 7) आजारपणाची रजा :  SL  रजांची शिल्लक मर्यादा 30 वरून 5 ने वाढ करून 35 करण्यात आली आहे.

  • 8) कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीने शिफ्ट सुरू होताना कामगारांसाठी योगा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे.

  • 9) सर्व कायम कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून एकदा GPA व मेडिक्लेम पॉलिसी संदर्भात कंपनीकडून माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

  • 10) वाहन कर्ज :   दुचाकी प्रमाणेच चार चाकी गाडी घेण्यासाठी 20000/- रुपये बिनव्याजी मिळेल.

  • 11) गृहकर्ज, घर दुरुस्ती कर्ज, वाहन कर्ज हे सर्व कर्ज कर्मचाऱ्याला सर्विस मध्ये 2 वेळेस मिळेल. कंपनीकडून  बँक कर्ज सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कर्ज सुविधा पूर्ण बंद करण्यात येतील

  • 12) फेस्टिवल ॲडव्हान्स : सध्या मिळत असलेल्या 10,000 रुपयांमध्ये 2,000 रुपयांची वाढ होऊन 12,000 रुपये ऍडव्हान्स देण्यात येईल.

  • 13) मेडिकल इमर्जन्सी ॲडव्हान्स : आपत्कालीन उचल म्हणून एका महिन्याचा पगार देण्यात येईल संबंधित रक्कम 12 हप्त्यात परतफेड करण्यात येईल.

  • 14) कॅन्टीन :- 1) तिसऱ्या पाळीतील  कामगारांना आठवड्यातून 3 वेळेस अंडी देण्यात येतील.

                                2) दूध व आईस्क्रीम हे अमूल ब्रॅण्ड चे देण्यात येईल.

  • 15) इन्सेंटिव्ह स्कीम : वेतन वाढ झाल्यानंतर दोन महिन्यात चर्चेला सुरुवात करण्यात येईल.

  • 16) ग्रॅज्युईटी : वेतनवाढ कराराच्या कालावधीत जे कामगार सेवानिवृत्त होतील अशा कामगारांना सुधारित वेतनवाढ कराराच्या कॅल्क्युलेशन नुसार ग्रॅज्युईटी ची रक्कम देण्यात येईल. उदा.कै.खंडू देवकर यांना याचा फायदा होईल.

  • 17) नोकरी : व्हॅक्कॅन्सी असल्यास अगोदर कामगारांच्याच मुलांना घेण्यात येईल, नवीन कायम कामगार झाल्यास त्यास सायझिंग विभागात टाकले जाईल. 

  • 18) दीर्घकालीन सेवा बक्षीस : 25 वर्ष सेवा केलेल्या कामगारांसाठी 5 ग्रॅम सोने, पत्नीला 10 ग्रॅम चांदीचे नाणे, रु. 6000/- गिफ्ट कुपन आणि ट्रॉफी  देण्यात येईल.

  • 19) सेवा निवृत्ती बक्षीस : रु.25 हजार रूपये व स्मृतिचिन्ह आणि रु.2500/- गिफ्ट कुपन देण्यात येईल.

  • 20) शैक्षणिक अनुदान : रु.500/- वाढ होऊन. रु.1900 /- प्रति  2 पाल्यास देण्यात येईल.

  • 21) कर्मचारी श्रेणी : दर 6 वर्षांनी ग्रेड (श्रेणी) बदलण्यात येईल. तसेच इन्क्रिमेंट च्या रेट मध्ये 20 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे

  • 22) बेटी बचाव बेटी पढाव संकल्प ने अंतर्गत : नवीन जन्म झालेल्या मुलीच्या नावे रु.5000/- हे 2 मुलींसाठी देण्यात येईल.

  • 23) कंपनीच्या आवारात कामगारांसाठी ग्रंथालयांमध्ये न्युज पेपर देण्यात येईल.

  • 24) मल्टी मशीन अलाउन्स हा प्रतिमाह प्रत्यक्ष हजर दिवसावर प्रत्यक्षात चालू करण्यात आला आहे.

  • 25) PUC :  वर्षातून एकदा टू व्हीलर  प्रमाणेच फोर व्हीलर साठी सुद्धा PUC तपासणी करण्याची व्यवस्था कंपनीकडून करण्यात येईल.

  • 26) जे कामगार जनरल शिफ्ट मध्ये काम करतात त्यांच्यासाठी  8 a.m. ची जनरल शिफ्ट चालू करण्यात आली आहे.

  • 27) सायझिंग  विभागातील कामगारांना तीन वर्षातून एकदा जिथे मॅन्युअल काम आहे अशा ठिकाणी पूर्वीप्रमाणेच हँडल च्या नवीन खुर्च्या व जिथे ऑटो काम आहे तिथं विना हँडल असलेली खुर्ची देण्यात  येतील.

      या करारावर व्यवस्थापनाकडून इंडिया ऑपरेशन राजेश मिरानी, प्लॅंटहेड ऋषी पुरुषोत्तम,  एच.आर.हेड सुधीर पोळ, एच आर मॅनेजर बाबासाहेब खिलारी आणि युनियनच्या वतीने अध्यक्ष श्रीमंत तात्यासाहेब शितोळे, विठ्ठल हांडोरे, जनरल सेक्रेटरी बाबसाहेब निर्मळ, सह सेक्रेटरी रमेश म्हस्के, खजिनदार सोमनाथ ठोंबरे, सदस्य सुरेश निमसे, सदस्य संतोष थोरात, सदस्य खंडू फुंदे, सदस्य श्री.मनोज गोरे यांनी सह्या केल्या.

      युनियन प्रतिनिधींची अभ्यासपुर्ण मांडणी, व्यवस्थापनाचा सकारात्मक दृष्टीकोन आणि कामगारांनी दाखविलेला विश्वास या बाबींचा करार वेळेत पुर्ण करण्यासाठी महत्वाचा वाटा असल्याचे युनियनचे अध्यक्ष श्रीमंत तात्यासाहेब शितोळे यांनी सांगितले.