येरवडा पुणे येथील बांधकाम साईटवर झालेल्या अपघात बाबत भारतीय मजदूर संघाची मागणी
पुणे : दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे नगर रस्ता येरवडा येथे बेसमेंट चे काम चालू असताना, अचानक पणे लोखंडी वजनदार स्लँबची जाळी कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला व अनेक कामगार जखमी झाले आहेत.
या मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई व बांधकाम कामगारांना न्याय देण्याचा हेतूने भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा चे शिष्टमंडळाने कामगार उपायुक्त अभय गीते यांच्याशी चर्चा करून कामगारांना , त्यांच्या वारसांना कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी मागणींचे निवेदन देण्यात आले.
भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख मागण्या -
1) अपघाताची सखोल चौकशी, करून दोषी कंपनी व ठेकेदाराचे परवाने रद्द करण्यात यावेत.
2) या चौकशी मध्ये संघटनेचे प्रतिनिधीना सहभागी करून घ्यावे.
3) अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून रू 50 लाख व शासनाच्या किमान वेतनाच्या किमान 50% रक्कम प्रति माहे पेंशन म्हणून देण्यात यावी, जखमी कामगारांना चांगले उपचार करण्यात यावेत. व रू 25 लाख रू आर्थिक मदत द्यावी.
4) चौकशी अहवाल त्वरित सादर करून अपघात टाळण्यासाठी प्रमाणीत पध्दत( STARAND OPERATING PROCEDURE) निश्चीत करण्यात यावी. व त्यांचे अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी.
अशी मागणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने करण्यात आली आहे . या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण व बांधकाम कामगार संघांचे पदाधिकारी उमेश विस्वाद उपस्थित होते. या बाबतीत शासनाने, बांधकाम कंपनी ने कामगारांना न्याय न दिल्यास भारतीय मजदूर संघ तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण व उमेश विस्वाद यांनी दिलेला आहे