463 कामगारांना त्वरीत कामावर घेण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश

स्पाईस जेट या कंपनीमधील 463 कामगारांना त्वरीत कामावर घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने बुधवारी कंपनीला दिले असे वृत्त सामना वृत्तसंस्थेने दिले आहे.

    स्पाईसजेट कंपनीने 31 डिसेंबरपासून या कामगारांना काम नाकारून त्यांच्या जागी सेलेबिनास एअरपोर्ट सर्व्हिसेस या कंत्राटदाराच्या माध्यमातून कामगार नेमले होते. ऑल इंडिया स्पाईस जेट स्टाफ आणि एम्प्लॉइज असोसिएशनने याविरुध्द आवाज उठवला होता. 

    मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंग ऑपरेशनचे काम करणार्या स्पाईस जेट लिमिटेड या कंपनीमधील सर्व कामगारांना नोकरीमध्ये कायम करावे, फिक्स्ड टर्म काँट्रक्टच्या नावाखाली त्यांना राबवून अशा कामगारांना केव्हाही कामावरून काढून टाकण्याची अनुचित कामगार प्रथा बंद व्हावी आदी मागण्या असोसिएशनने केंद्र सरकारकडे उपस्थित केल्या होत्या. केंद्र सरकारने त्या औद्योगिक न्यायालयाकडे पाठविल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मागण्यांवर औद्योगिक न्यायालयापुढे सुनावणी झाली. परंतु औद्योगिक न्यायालयाचे पीठासीन अधिकारी शाम सुंदर गर्ग यांचा 29 डिसेंबरचा 'जैसे थे' चा आदेश असतांनाही स्पाईसजेटने तो झुगारला. कंपनीच्या या मनमानीविरुध्द असोसिएशनने न्यायालयात धाव घेत प्रभावी युक्तीवाद केला. त्यावर न्यायालयाने 463 कामगारांना त्वरीत कामावर घेण्याचे आदेश स्पाईसजेट कंपनीला दिले.