पुणे : ई-श्रम पोर्टलवर असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करावी असे आवाहन केंद्र सरकार कडून करण्यात आले.त्यानुसार साफल्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या वतीने संघटनेच्या घरेलु महिला कामगार यांचे नोदणीअभियान श्री समर्थ मंडळ हॉल पुणे येथे ९ डिसेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आले.
पुणे शहर व जिल्ह्यात वस्ती, भाग स्तरावर संघटनेच्या उर्वरित बांधकाम कामगार व घरेलु महिला कामगार सभासदांची ई-श्रमनोंदणी अभियान कोरोना महामारी परस्थितीचाअंदाज घेऊन शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात येईल.
यावेळी शरद पंडित प्रदेश सरचिटणीस यांनी सांगितले कि, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ संघटनेच्या सभासदांना मिळावा यासाठी ई-श्रम नोंदणी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. नोंदणी केलेल्या कामगारांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे,तसेच अनेक सुविधा दिल्या जाणारआहेत,त्यामुळे कामगारांना नवी ओळख मिळणार आहे.
या नोंदणी अभियानासाठी मिना पंडित प्रदेश उपाध्यक्ष, सुवर्णा कोंढाळकर प्रदेश चिटणीस, उषा जाधव जिल्हा अध्यक्ष, सुनीता बढे, संध्या आदावडे, वर्षा ताडे, स्वाती डिसुझा, मिणाझ शेख, सुजाता गुंजाळ, वनिता इवरे, वैशाली फाटे, उषा मोहिते, राजश्री महाडेश्वर, सुलोचना पवार इत्यादी संघटना कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.