मुंबई : मुंबई शहरातील मलबार हिल या ठिकाणी केम्प्स कॉर्नर हॉटेल (Hotel Kemps Corner) व्यवस्थापन व श्रमिक उत्कर्ष सभा ही कामगार संघटना यांच्या मध्ये अत्यंत आनंदाच्या वातावरणात वेतन व इतर भत्ते वाढ करार संपन्न झाला.
वेतन व इतर वाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- सदर करार दि.1 ऑक्टोबर 2021 ते दि.30 सप्टेंबर 2025 असा 4 वर्षासाठी करण्यात आलेला आहे.
- पगारवाढ : कामगारांना दरमहा रु.9,000/-
- वेतनवाढ मधील 60 % रक्कम Basic व DA मध्ये देण्यात येईल व 40% वाढ इतर Allowances मध्ये देण्यात येईल
- 25 वर्ष सेवा झालेल्या कामगारांना वार्षिक अतिरिक्त मासिक एकूण पगार
- मागील वेतनवाढ करार 5 वर्ष कालावधीचा होता तर नवीन वेतनवाढ करार 4 वर्षाचा करण्यात आला.
- थकबाकी रक्कम म्हणून प्रत्येक कामगारांला एक रकमी रु.44,000/- रुपये दिनांक 15 डिसेंबर पर्यंत देण्यात येणार आहेत
करारावेळी केम्प्स कॉर्नर हॉटेल (Hotel Kemps Corner) व्यवस्थापनातर्फे मालक संजय अवत रमानी व हॉटेल व्यवस्थापनाचे एच आर प्रमुख जुलीयन व त्यांचे सहकारी निलकंठ तर श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार संघटने तर्फे संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड, श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस जितेंद्र कांबळे, संघटनेचे उपाध्यक्ष महेश सावंत व संघटनेचे कोषाध्यक्ष प्रफुल्ल सरवदे व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. व कामगार वर्गातून कामगार युनिट प्रतिनिधी श्री हरीश, ऍंथोनी, एरिक, संतराज व अनेक कामगार वर्ग उपस्थित होते.