राज्यातील बेकरी उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि.९ जानेवारी २०१७ रोजी व विशेष भत्ता रक्कम दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाली असून या बेकरी उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.
महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो.
राज्यातील बेकरी उद्योगातील कामगारांना दर महिन्याला किमान वेतन कायदा, १९४८ (The Minimum Wages Act, 1948) नुसार खालील प्रमाणे किमान वेतन मिळणे गरजेचे आहे -
१) कुशल कामगार : १०,१००/- + ३,७१८/- = १३,८१८/-
२) अर्ध कुशल कामगार : ९,२००/- + ३,७१८/- = १२,९१८/-
३) अकुशल कामगार : ८,२५०/- + ३,७१८/- = ११,९६८/-
१) कुशल कामगार : ९,७५०/- + ३,७१८/- = १३,४६८/-
२) अर्ध कुशल कामगार : ८,८००/- + ३,७१८/- = १२,५१८/-
३) अकुशल कामगार : ७,९००/- + ३,७१८/- = ११,६१८/-
१) कुशल कामगार : ९,३५०/- + ३,७१८/- = १३,०६८/-
२) अर्ध कुशल कामगार : ८,४५०/- + ३,७१८/- = १२,१६८/-
३) अकुशल कामगार : ७,५००/- + ३,७१८/- = ११,२१८/-
व्याख्या :
परिमंडळ १ - महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्र तसेच महानगरपालिका क्षेत्रापासून २० कि.मी पर्यंत औद्योगिक क्षेत्र
परिमंडळ २ - महाराष्ट्र राज्यातील सर्व 'अ' व 'ब' नगरपालिकांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्र तसेच नगरपालिका क्षेत्रापासून २० कि.मी पर्यंत औद्योगिक क्षेत्र
परिमंडळ ३ - परिमंडळ १ व परिमंडळ २ सोडून सर्व क्षेत्र
टीप - विशेष भत्ता रक्कम दर सहा महिन्याला बदलली जाते त्यानुसार मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रकम = किमान वेतन रक्कम गणली जाते.
राज्यातील बेकरी उद्योगामधील मूळ किमान वेतन दर अधिसूचना दि.९ जानेवारी २०१७ पाहण्यासाठी - क्लिक करा
दि. १ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिद्ध झालेले मूळ किमान वेतन + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन पत्रक - क्लिक करा