खेड : धानोरे,मरकळ येथील स्लिक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (Sleek International Pivate Limited) व शिवछत्रपती कामगार संघटना यांच्या मध्ये दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला. याकरिता समेट अधिकारी तथा सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी काम पाहिले.
वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :
- सदर करार तीन वर्षाचा आहे (१ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२४) या तीन वर्षासाठी रु.९,९००/- पगारवाढ
दुसरे वर्ष = रु.२४७४/-
तिसरे वर्ष = रु.१९८०/-
- पगारवाढीतील ५०% रक्कम मूळ पगारामध्ये समाविष्ठ करण्यात आली.
- २ लाख रुपयांचा मेडिक्लेम कंपनीमार्फत मोफत
- प्रत्येक कामगारास करार फरक रक्कम रु.४५,०००/- मिळणार
- दरवर्षी दिवाळीपूर्वी बोनस रु.२२,०००/- मिळणार
यावेळी करारावर कंपनी व्यवस्थापन वतीने रणजित घोरपडे (व्हीपी मॅनुफॅक्चरिंग), दिलीप दोंडाल (जनरल मॅनेजर), ऋषिकेश गिरमे (मॅनेजर,एचआर), बेसिल तकलीय, मनोज शिरसागर आणि संघटनेच्या वतीने अनिल कदम (कार्याध्यक्ष), योगेश काकडे (जनरल सेक्रेटरी), गणेश काकडे (उपाध्यक्ष), कामगार प्रतिनिधी अरविंद गावडे, अजय गावडे यांनी सह्या केल्या.
हा करार अस्तित्वात येण्यासाठी कामगार नेते श्री रामचंद्र बी शरमाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. करार अस्तित्वात आल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.