मुंबई : महाराष्ट्र शासन यांनी औद्योगिक संबंध संहिता ,2020 राजपत्र दिनांक 03 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाले आहे. तरी ह्या ड्राफ्ट रुल संदर्भात कोणताही व्यक्ती कडुन हे राजपत्र प्रसिद्ध झाल्या पासून 45 दिवसांच्या आत ह्या संदर्भातील आक्षेप, हरकती,सुचना ह्या खालील नमूद करण्यात आलेल्या पत्यावर आणि ई-मेल वर पाठविण्यात यावे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून 45 दिवस समाप्त झाल्यानंतर हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल.
45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400059 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर प्राप्त होतील असे कोणतेही आक्षेप/सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील.
औद्योगिक संबंध संहिता ,2020 प्रारुप पाहण्यासाठी :👉 क्लिक करा