ग्रुपो ॲन्टोलीन इंडिया प्रा.ली.(Grupo Antolin India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

रांजणगाव : येथील औद्योगिक नगरीतील ग्रुपो ॲन्टोलीन  इंडिया प्रा.ली.(Grupo Antolin India Pvt Ltd) व ग्रुपो ॲन्टोलीन पुणे कामगार संघटना यांच्यामध्ये पाचवा वेतन वाढीचा ऐतिहासिक करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात वार गुरुवार दि.2 डिसेंबर 2021 रोजी संपन्न झाला.

वेतन व इतर वाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • सदर करार दि.1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीसाठी लागू असेल.

  • 3 वर्षासाठी प्रत्यक्ष वाढ रक्कम रु.18,000 /-

  • सदर रक्कम प्रथम वर्ष रु.5,000/- दुसरे वर्ष रु.6,500/- व तृतीय वर्ष रु.6,500/- टप्यामध्ये देण्याचे मान्य केले आहे.

  • एकूण अप्रत्यक्ष वाढ रक्कम रु. 20131/- 

  • 11 महिन्याचा फरक दिला जाईल.

  • मेडिक्लेम पॉलिसी (GMC) : 2.25 लाख रुपये  तसेच 10 लाख बफर अमाउंट ठेवण्यात आली आहे . (स्वतः कामगार ,पत्नी , 2मुले)

  • आई- वडिल वरील रकमेमध्ये समाविष्ट असून त्यांच्यामुळे वाढत असलेल्या प्रीमियमच्या 70% टक्के कंपनी व 30% टक्के कामगारांकडून घेण्यात येणार आहे.

  • मुदतविमा (GTL) : कोणत्याही प्रकारे मृत्यू आल्यास रु.30,00000/-(तीस लाख)

  • मृत्यू सहाय्य निधी : सर्व कंपनीतील  कामगारांचा एक दिवसाचा पगार

  • ऍडव्हान्स रक्कम : रु.30,000/-

  • दिवाळी बोनस : प्रथम वर्षासाठी रु.32,000/-, दुतीय वर्षासाठी रु.35,000/-, तृतीय वर्षासाठी : रु.38,000/-

  • दिवाळी गिफ्ट : दिवाळी गिफ्ट म्हणून दिवाळी मध्ये चांगल्या प्रतीची भेट वस्तू देणेचे मान्य केले आहे.

  • मागील करारातील सर्व सेवा शर्थी व अटी आहे तशाच पुढे चालु राहतील असे उभय पक्ष्यानी मान्य केले आहे.

   सदर करारावेळी कंपनीच्या वतीने दत्तात्रय बहिरट (जनरल मॅनेजर), जॉईस सॅम्यल (जनरल मॅनेजर- कार्पोरेट एच आर), प्रशांत इथापे सर (ए जी एम- एच. आर), वैभव राऊत ( मॅनेजर- प्रोडक्शन), वैभव पाथरकर (मॅनेजर-एच आर), सुनील नासरे (मॅनेजर- मेंटेनन्स), जितेंद्र काकडे (मॅनेजर - इंजीनियरिंग), हरीगोपाल वांगोरी (एक जी एम क्वालिटी) व संघटनेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय ज्ञानदेव सात्रस, जनरल सेक्रेटरी दत्तात्रय गायकवाड, उपाध्यक्ष सतिश घुगे व मनोज विश्वासराव, सह सेक्रेटरी केतन सराळकर खजिनदार बापू कड, सदस्य गुलाब दानवले यांनी काम पाहिले.    

     सदर करारासाठी ॲटलस स्पॅको संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष माननीय किशोर ढोकले साहेब, श्री शिवाजी खटकाळे (कार्याध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ) श्री राजू अण्णा दरेकर (उपाध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ) श्री सुनील सात्रस (आदर्श सरपंच) यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले. हा करार यशस्वी होण्यासाठी कामगार क्षेत्रातील कामगार प्रतिनिधींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे आभार संघटनेच्या वतीने मानण्यात आले.

कामगार नामा Youtube चॅनल पाहण्यासाठी : क्लिक करा

कामगार विषयक बातम्या पाहण्यासाठी : क्लिक करा