रत्नागिरी : लोटे औद्योगिक क्षेत्रातील कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड (Kansai Nerolac Paints Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि कंसाई नेरोलॅक पेंट्स एम्प्लॉईज युनियन व प्रेरणा कामगार संघटना यांच्या मध्ये सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या मध्यस्थीने वेतन वाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- पगारवाढ : कामगारांना दरमहा रु.13,000/-
- सदर करार दि.1 एप्रिल 2019 ते दि.31 मार्च 2024 असा पाच वर्षासाठी करण्यात आलेला आहे.
- वेतनवाढ मधील 60 % रक्कम Basic व DA मध्ये देण्यात येईल व 40% वाढ इतर Allowances मध्ये देण्यात येईल.
- मेडिक्लेम पॉलिसी रु.1.5 लाख करण्यात आली.
- सहलीसाठी प्रति कामगार रु.2000/- करण्यात आले.
- कामगाराचा आकस्मिक मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास कामगारांचे 2 दिवसाचा पगार व त्या एकूण रकमेच्या दुप्पट रक्कम कंपनी व्यवस्थापन टाकून मदत दिली जाणार.
करारावेळी व्यवस्थापनातर्फे व्ही.एन.भाटवडेकर (GM-ER), यु.एम.रुगे (Works Manager), एस.आर.देशमुख (Sr.Manager-HR), एस.डि.पटोले (Manager-HR), ए.एन.साळुंखे (Manager Production), एन.व्ही.सुर्वे (Executive-HR), ए.एम.रिंधे (Executive-HR) तर कामगार संघटने तर्फे प्रेरणा कामगार संघटनेचे अध्यक्ष आर.एल.देसाई, उपाध्यक्ष पी.एल.गावडे, सचिव एम.जी.घडशी, सह सचिव एस.एस.ठाकूर, खजिनदार एस.सी.सावंत, सदस्य आर.एन.डांगे व के.एम.गाडगे तसेच कंसाई नेरोलॅक पेंट्स एम्प्लॉईज युनियन तर्फे अध्यक्ष व्ही.आर.पांढरे, उपाध्यक्ष एस.ए.कदम, सचिव जी.व्ही.हलदे, सह सचिव जी.डि.आंब्रे, खजिनदार एन.जी.शेठ, सदस्य टि.एस.घाग व व्ही.एस.आंब्रे यांनी स्वाक्षरी केली.
या करारामुळे सर्व कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कराराचे वैशिष्ठ्य म्हणजे या करारामध्ये कंसाई नेरोलॅक पेंट्स एम्प्लॉईज युनियन व प्रेरणा कामगार संघटना या दोन्ही संघटनांना एकत्र आणुन हा सामंजस्य करार पार पाडण्यात आला.सर्व कामगार यांनी व व्यवस्थापनाने सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांचे मनापासून आभार मानले आहेत.
कामगार नामा Youtube चॅनल पाहण्यासाठी : क्लिक करा
कामगार विषयक बातम्या पाहण्यासाठी : क्लिक करा