एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपास "राष्ट्रीय श्रमिक आघाडी" च्या वतीने पाठिंबा - कामगार नेते यशवंतभाऊ भोसले

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड एसटी आगार येथील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन कामगार नेते,  राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी राज्यव्यापी संपास पाठिंबा दिला.

    यावेळी बोलताना भोसले म्हणाले कि, एसटी च्या सर्व कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनिकरण करावे या प्रमुख मागणीस राष्ट्रीय श्रमिक आघाडी पाठिंबा देत असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनामध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडी देखील सहभागी होईल. 

    या वेळी पिंपरी चिंचवड एसटी आगार चे संघटनेचे प्रवीण मोहिते, ओमप्रकाश गिरी, प्रवीण जाधव, विजय साबळे, अश्विनी गायकवाड, नीलम कदम, मनीषा वाझे, अशोकराव नारकर, नरेंद्र गव्हाणे, अरविंद शेंडगे, सागर खुडे, पौर्णिमा होनकळसे, सिद्दार्थ कोटे, दिलीप भोसले, दर्पना झेंडे, बी. के. जाधव गणेश भांडळे इ. प्रतिनिधी व कर्मचारी आंदोलनस्थळी होते. तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडी चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश शिंदे व पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश जेधे, अनिल कोंडे, प्रवीण जाधव, अमोल घोरपडे इ.संघटनेचे नेते उपस्थित होते.