पिंपरी चिंचवड : येथील औद्योगिक नगरीतील विलो मॅथर ॲण्ड प्लॅट पंप्स.प्रा.लिमि. (Wilo Mather and Platt Pumps Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि मॅथर ॲण्ड प्लॅट एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये अकरावा वेतनवाढीचा करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- सदर करार दि.01 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2023 या 39 महिन्याच्या कालावधीसाठी लागू असेल.
- एकूण पगारवाढ : रक्कम रु.15,500/- (CTC) पुढील टप्यामध्ये देण्याचे मान्य केले असून त्यामध्ये 50 टक्के रक्कम बेसिक मध्ये टाकण्यात येईल व सध्याची व्हेरियेबल स्कीम (PLPLES) बंद करून पगारवाढ पुढीलप्रमाणे.
2)01/11/2021 ते 30/11/2022 या तेरा महिन्यासाठी रु.1500/-
3) 01/12/2022 ते31/12/2023 या तेरा महिन्यासाठी रु.2500/-
- सेवा पगार वाढ : सेवा कालावधी नुसार 165 रुपये ते 365 रुपये बेसिक मध्ये देण्यात येतील. (Part of CTC)
- अपघात विमा (GPA) : अपघात विमा म्हणून रू.10 लाख रुपये करण्यातआला असून 5 लाखाचे बर्डन कंपनी घेणार व 5 लाखाचे बर्डन कामगार घेणार आहेत.
- रजा प्रवास भत्ता : सध्या मिळणाऱ्या 10,296/- रजा प्रवास भत्यामध्ये वाढ करून तो 16,296/- करण्यात आला आहे. (Part of CTC)
- स्पेशल इन्क्रीमेन्ट : तीन वर्षात 2 टक्के कामगारांना देण्यात येईल.
- वार्षिक हजेरी बक्षीस : सध्याची योजना कोणत्याही बदलाशिवाय सुरु राहील.
- रजा : एका वर्षात पूर्व परवानगीने 6 सिंगल PL/ EL घेण्याची नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. बाकीच्या रजा पुर्वी प्रमाणेच चालु राहील
- शैक्षणिक उचल : उच्च शिक्षणासाठी रू.60,000/- (रुपये साठ हजार) व डिप्लोमा साठी 30,000/- ( रुपये तीस हजार) एका वर्षात एकूण 4 लाख 80 हजार रुपये जास्तीत जास्त शैक्षणिक कर्ज म्हणून मिळेल.
- बाहेरगावचा भत्ता : राहणे रु.600/- वरून रु.650/-, खाणे रु.550/- वरून रु.600/-
- बोनस/सानुग्रहअनुदान :
सन 2021-22 = रु.40,100/-
सन 2022-23 = रु.40,100/-
- रात्रपाळीचा भत्ता : रात्रपाळीचा भत्ता प्रति शिफ्ट 135/- वरून 182/- रुपये करण्यात आला आहे. तसेच रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांना 200ml -दूध देण्यात येईल. ( Part of CTC)
- मल्टी मशीन भत्ता : प्रति शिफ्ट प्रत्येक जादा मशीन साठी रु.50/- मल्टी मशीन भत्ता मिळेल.
- दिर्घ सेवा पारितोषिक : सध्या चालू असलेल्या 25 वर्षी दीर्घ सेवा पारितोषिका व्यतिरिक्त 15 व 20 वर्षासाठी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ देण्यात येईल.
- अंत्यविधी खर्च : कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यविधी खर्च हा 5,000/- वरून 10,000/- रुपये करण्यात आला आहे.
- वेलफेअर : वेलफेअर सोसायटी साठी सध्या कपात होणाऱ्या रु.50 /- मध्ये वाढ करून ती रु.100/- करण्यात आली आहे. समान रक्कम कंपनीही देणार आहे.
- गणवेश : प्रत्येक वर्षी गणवेशाबरोबर एक विलोचा लोगो असलेला टी- शर्ट देण्याचे मान्य केले आहे.
- फरकाची रक्कम : मागील 12 महिन्याच्या फरकापोटी 1,29,330/- रुपये कामगारांना मिळणार आहेत व त्यामधील रु.4,000/- संघटनेसाठी देणगी म्हणून कपात करण्यात येणार आहेत.
- मागील करारातील सर्व सेवा शर्थी व अटी आहे तशाच पुढे चालु राहतील असे उभय पक्ष्यानी मान्य केले आहे.
सदर करार यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या वतीने हेमंत वाटवे साहेब (एम.डी & सि.ई.ओ.), डॉ.सुनील कोदे साहेब ( हेड-एच.आर.), जयंत देशपांडे (प्लांट हेड), मनोज बाफना (क्वालिटी हेड), श्रीधर जाधव ( डी. जी. एम.- एच.आर.), प्रविण दिवटे ( डी.जी.एम.- व्ही. टी. असेंम्बली), प्रद्युम्न वसाने (सिनिअर मॅनेजर - एच. एस.सी. असेंम्बली), श्रीमती. प्राची पोरे ( मॅनेजर-एच.आर.), प्रदीप जाधव ( सिनिअर मॅनेजर- PED), विश्वजित कुलकर्णी (सिनिअर एक्झिक्युटिव्ह फायनान्स), सुनील बागल (कंपनी कन्सल्टंट), संभाजी काकडे साहेब (कंपनी कन्सल्टंट) यांनी काम पाहिले.
संघटनेच्या वतीने अध्यक्ष गणेश कानेटकर, जनरल सेक्रेटरी दत्तु झेंडे, उपाध्यक्ष अमोल शेळके व मानसिंग शिंदे. जॉ.सेक्रेटरी मारुती राऊत व यशवंत हारे. (जॉ सेक्रेटरी), खजिनदार विकास करपे, मनोज जोंधळे सदस्य प्रमोद महाजन यांनी काम पाहिले
सदर करारासाठी श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुतीराव जगदाळे व ऑप्शन पॉझिटीव्हचे अरविंद श्रोती यांचे तसेच श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार, सर्व पदाधिकारी आणि कामगार क्षेत्रातील कामगार प्रतिनिधींनी सहकार्य लाभले.