'कामगार नामा' याचा आज दुसरा वर्धापनदिन यानिमित्त सुरु होत आहे 'कामगार नामा न्युज चॅनल'

सर्व प्रकारच्या संघटित, असंघटित कामगार यांच्या साठी सर्व कामगार विषयक माहिती, विविध कामगार कायदे माहिती, केंद्र व राज्यसरकार यांच्या विविध कामगार विषयक योजना, विविध कंपनी / आस्थापना यामध्ये होणारे वेतनवाढ करार माहिती, भविष्य निर्वाह निधी (PF), ESIC बाबत माहिती, शासनाचे विविध कामगार मंडळे यांच्या विषयी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि.8 ऑक्टोबर 2019 रोजी दसरा (विजयादशमी) शुभमुहूर्तावर 'कामगार नामा' या मासिकाची सुरुवात करण्यात आली.

     'कामगार नामा' मासिक ची वाटचाल चालू असताना दि.19 नोव्हेंबर 2020 रोजी www.kamgarnama.com न्यूज वेब पोर्टल चालू करून त्यावरती सर्व कामगार विषयक माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यास सर्व क्षेत्रातील कामगारांनाही उस्फुर्त प्रतिसाद दिला व 10 महिन्याच्या कालावधीमध्ये कामगार नामा वेब न्यूज पोर्टल ला 22 लाख views प्राप्त झाले.

याप्रमाणे 'कामगार नामा' ची वाटचाल चालू असताना दि.15 ऑक्टोबर 2021 रोजी असणाऱ्या द्वितीय वर्धापन दिन व दसरा याचा शुभमुहूर्त साधून 'कामगार नामा न्युज चॅनल' Youtube च्या माध्यमातून सर्व कामगार जगतासमोर येत आहे, या Youtube चॅनल ला तुम्ही प्रचंड प्रतिसाद देताल हि अपेक्षा.

कामगार नामा न्युज Youtube चॅनल पाहण्यासाठी तसेच Like व  Share करा : 👉 क्लिक करा