शिरवळ,सातारा : शिरवळ,सातारा येथील एशियन पेंट लिमिटेड (Asian Paints Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि एशियन पेंट एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- कराराचा कालावधी दि.1 जुलै 2021 ते 30 जून 2024 या 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.
- सर्व कामगारांना एकरकमी प्रति महिना रु.14,100/- व CTC सहित रु.16,500/- वेतनवाढ करण्यात आली. यामध्ये रु.500/- हे हजेरीभत्ता असेल.
- दि.1 एप्रिल 2021 पासून पूर्ण कालावधीचा पूर्ण रकमेचा फरक देण्यात येणार
- बोनस :
2) 2022 या वर्षासाठी - रु.39,000/-
3) 2023 या वर्षासाठी - रु.41,000/-.
- दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्ष गणवेषाचे तीन संच, दरवर्षी सीझनल प्रोटेक्शन देण्याचे मान्य करण्यात आले आहे तसेच हे सर्व यापुढेही चालू राहील.
- विवाहासाठी भेट :पूर्वीप्रमाणे कामगाराचे स्वतःचे तसेच स्वतःच्या दोन अपत्यांच्या लग्नानिमित्त रु.10,000/- गिफ्ट देण्यात येईल.
- मेडिक्लेम पॉलिसी : कामगारांच्या कुटुंबातील चार व्यक्ति (स्वतः कामगार, त्याची पत्नी, आई, वडील किंवा दोन अपत्य ) विमा रक्कम वार्षिक रु.3,00,000/- रूपये (तीन लाख रुपये) करण्यात आली.
- दिवाळी स्वीट : 1.5 किलो मिठाई व ड्रायफ्रूट देण्यात येणार
- प्रति महिना 1 इमर्जन्सी साठी (2 तासाचा ) गेटपास मिळेल ज्यासाठी सुट्टी भरावी लागणार नाही.
- कौटुंबिक सांस्कृतिक महोत्सव (फॅमिली डे ) : कामगारांना तसेच परिवारातील सदस्य (पती/ पत्नी,अपत्य ) यांच्यासाठी कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आणि त्यानिमित्ताने गिफ्ट मध्ये रु.1,500/-फिक्स करण्यात आले.
- संघटना ऑफिस : संघटनेच्या नैमित्तिक कामे तसेच मासिक मिटींग व इतर कामकाजसाठी सर्व सोयी युक्त असे नवीन ऑफिस देण्याचे मान्य करण्यात आले.
करारावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष विवेक वाघमारे, बिस्वा बन्दु बारीक़, गुलज़ार मोहम्मद, महेश पूहान, विकास जाधव, सुरजीत शर्मा, नीरज लोधी तसेच कंपनीच्या वतीने वैभव दीक्षित (प्लांट हेड), साहिल गुप्ता (एच.आर हेड), प्रियांग वैद्य (प्रोडक्शन हेड ), महेश बारसकर (क्वालिटी हेड), निषाद दिवेकर (आय. आर. चीफ मॅनेजर) यांनी सह्या केल्या. त्याचबरोबर हा करार होण्यासाठी अनुज सैनी (एचआर मॅनेजर), मनोज शिरसागर यांचेही सहकार्य लाभले. त्याचबरोबर हा करार सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील विविध मार्गदर्शक तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ठोकले, अविनाश वाडेकर, नवनाथ हरगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटना व व्यवस्थापन यांमधील असलेला विश्र्वास आणि निरंतर प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.