चाकण : पुणे चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरीग लिमि.(Suprajit Engineering Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि सुप्रजित एम्प्लाईज युनियन यांच्यामध्ये दि.13 ऑक्टोबर 2021 रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
- कराराचा कालावधी दि.1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2024 या 3 वर्ष 3 महिने कालावधीसाठी लागू असेल.
- पगारवाढ : प्रत्यक्ष रु.12,000/- व अप्रत्यक्ष रु.15,000/- झाला असुन
द्वितीय वर्षासाठी : रु.3,600/-
तृतीय वर्षासाठी : रु.2,400/- याप्रमाणे करण्यात आली आहे.
- फरकाची रक्कम हि दि.1 जानेवारी 2021 पासुन ग्राह्य धरण्यात आली.
- 50% रक्कम हि मुळ पगारात (Basic) वाढविण्यात आली.
- मेडिक्लेम पाॕलिसीमधे फॅमिली,आई व वडिल रु.1 लाख पर्यंत करण्यात आली. मेडिक्लेम पाॅलीसीमधील वाढ ही प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष (CTC) रक्कमेच्या बाहेर आहे .
- सदर करार हा कुठल्याही प्रकारे कामाशी (production) निगडित नाही
- नाइट शिफ्ट अलाऊंस प्रति दिवस रु.30/-
करारावेळी व्यवस्थापनातर्फे शंकर नारायण (CEO), उपाध्ये (GM), संजय (H.R.Head), अनिल निघोजकर व संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास शिंदे, उपाध्यक्ष पिडाप्पा गोडा, जनरल सेक्रेटरी बीरबल चव्हाण, सह सेक्रेटरी सचिन डावरे, खजिनदार मुकुंद झणझण, सदस्य नोयल थामस, सतीश गोडा उपस्थित होते. करार यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, अविनाश वाडेकर यांनी केले.