ओग्निबेने इंडिया प्रा.लिमि (Ognibene India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

मावळ,पुणे : तळेगाव औद्योगिक नगरीतील ओग्निबेने इंडिया प्रा.लिमि (Ognibene India Pvt Ltd) तळेगाव दाभाडे ता.मावळ, जि.पुणे कंपनी व्यवस्थापन व ओग्निबेने एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये चौथा वेतन वाढीचा करार  मा.ना.संजय (बाळा) भेगडे (मा.कामगार, पुनर्वसन व पर्यावरण राज्यमंत्री) यांच्या उपस्थितीत शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात गुरुवार दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपन्न झाला.

    सदर करार हा पारंपारिक पदध्तीने न होता  एक वेगळया पदध्तीने विना मागणी पत्राने व तारखेच्या अगोदर  पुर्ण करून औद्योगिक क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • सदर करार दि.1 सप्टेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी लागू असेल.

  • ३ वर्षासाठी 17,500 /- रुपये सदर रक्कम (70-10-20) टप्यामध्ये देण्याचे मान्य केले आहे.

दिवाळी बोनस :

3 वर्षासाठी दिवाळी बोनस म्हणून रुपये 45,000/- प्रतिवर्ष देण्याचे मान्य केले आहे.

मेडिक्लेम पॉलिसी (GMC) :

3 लाख रुपये  तसेच 15 लाख बफर अमाउंट ठेवण्यात आली आहे . (स्वतः कामगार, पत्नी, 2मुले इ.)

आई- वडिलांसाठी स्वतंत्र 2 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी नवीन चालु करण्यात आली आहे.

मुदतविमा (GTL) :

मुदतविमा म्हणुन 17,00000/- (सतरा लाख)

मृत्यू सहाय्य निधी :

सर्व कंपनीतील  कामगारांचा एक दिवसाचा पगार व तेवढीच रक्कम कंपनी त्यामध्ये टाकून मृत्यू सहाय्य निधी म्हणून संबंधित कामगाराच्या वारसास देण्यात येईल.

रजा :

40 (EL-22 , SL-10 ,CL- 8) रजा देनेचे मान्य केले आहे.

गुणवंत कामगार :

वर्षाला दोन कामगारास गुणवंत कामगार पुरस्कार म्हणुन प्रत्येकी रुपये 10,000/-तसेच ट्रॉफी व सन्मान- पत्र देण्याचे मान्य केले आहे.

दिवाळी गिफ्ट :

दिवाळी गिफ्ट म्हणून दिवाळी मध्ये 2000/- रुपये किमतीची भेट वस्तू देणेचे मान्य केले आहे.

जर्किन :

प्रतिवर्ष नामांकित कंपनीचे एक जरकीन देणेचे मान्य केले आहे.

वाढदिवस भेट :

वाढदिवसानिमित्त प्रत्येक कामगाराला 500/- रुपये किंमतीची भेटवस्तू देनेचे मान्य केले आहे.

      मागील करारातील सर्व सेवा शर्थी व अटी आहे तशाच पुढे चालु राहतील असे उभय पक्ष्यानी मान्य केले आहे.

सदर करारावेळी कंपनीच्या वतीने राजेश त्यागी (एम. डी.), निखिल पुजारा (डायरेक्टर), योगेश वाणी (जनरल मॅनेजर- एच.आर.), मलिंद वत्स (ऑपरेशन हेड), अशोक यादव ( जनरल मॅनेजर-फायनान्स आणि अकाऊंट), अनिकेत निळेकर (मॅनेजर एच. आर.) तसेच संघटनेच्या  वतीने अध्यक्ष रघुनाथ गोरड, जनरल सेक्रेटरी अमोल निकम, उपाध्यक्ष संतोष मोहिते, खजिनदार पंडित हनमंते, सदस्य संतोष पवार, दत्तात्रय पाटील उपस्थित होते. सदर करारासाठी टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे कामगार नेते  महेंद्र कदम यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले. 

संघटनेच्या सर्व कामगारांनी  राखलेला  सयंम व  दिलेले सहकार्य तसेच महत्वाचे म्हणजे संघटना व संघटना प्रतिनिधी यांच्यावर ठेवलेला विश्वास याच्या बळावर हा करार यशस्वी झाला.