मनसेचे आंदोलन
नसरापूर : वरवे बुद्रुक येथील बहुराष्ट्रीय कंपनी एसेल इंडिया प्रा. लिमिटेड मधुन १६ कामगारांना जानेवारी महिन्यात अचानक कोणतेही कारण न देता कामावरुन काढले कामगार न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली असताना देखिल न्यायालयाच्या निर्णय धुडकावत कामगारांना कामावर न घेणाऱ्या व्यवस्थापनाच्या विरोधात पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रुपाली ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेट वर धरणे आंदोलन करण्यात आले असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
एसेल इंडिया कंपनीने जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये कोणतेही कारण न देता कंपनी मधील १४ कायमस्वरुपी व २ प्रशिक्षणार्थी कामगारांना तातडीने कामावरुन काढले असे अचानक काढल्याने कामगारांना मोठा धक्का बसला या बाबत कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी गेले असता व्यवस्थापनाने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला
या झालेल्या अन्याया बाबत कामगारांनी मनसेच्या पुणे येथील नेत्या रुपाली ठोंबरे यांना या बाबत लक्ष घालण्याची विनंती केली त्यांनी देखिल या बाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने या कामगारांसाठी शेवटी कामगार न्यायालयात दाद मागण्याचे ठरवण्यात आले त्या नुसार कामगार न्यायालयात एप्रिल २०२१ मध्ये तक्रार दाखल करताच न्यायालयाने या प्रक्रियेला जैसे थे असा आदेश देत कामगारांना कामावरुन कमी करण्यास स्टे दिला होता मात्र व्यवस्थापनाने न्यायालयाचा आदेश देखिल न मानता या कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला आहे.
या बाबत मनसेच्या रुपाली ठोंबरे यानी माहीती देताना सांगितले कि, बेकायदेशीररीत्या कामावरुन काढुन टाकण्याच्या कृती बाबत मनसे कडुन व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी ता.२८ रोजी कंपनीच्या गेट वर मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले शांततेत करण्यात येत असलेल्या या आंदोलनाला चिरडण्यासाठी व्यवस्थापना कडुन पोलिसांना पाचारण करण्यात आले होते मात्र कंपनी व्यवस्थापनच न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्या बाबत आमची तक्रार आहे कोणतेही कारण न देता कंपनी कामगारांना कामावरुन काढु शकत नाही या कामगारांना कोणत्याही अटी शिवाय त्वरीत कामावर घ्यावे अशी आमची मागणी आहे व त्यासाठी आमचा लढा चालु राहणार आहे.
