फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बारामती (Ferrero India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

बारामती : फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बारामती (Ferrero India Pvt Ltd) व इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये वेतनवाढ करार दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • वेतनवाढ करार चार वर्षाकरिता (दि.१ जुलै २०२० ते ३० जून २०२४) लागू.

  • सर्व कामगारांना  वेतनवाढ  १५५००/- + तसेच जादा ६७५/- रूपये हे जुलै २०२१ पासुन लागु होतील एकुण = १६१७५/- रुपये

वर्गीकरण खालील प्रमाणे :

१) २०२०-२१ पहिल्या वर्षाकरिता ३०% प्रमाणे = ४६५०/-रुपये
२) २०२१-२२ दुसऱ्या वर्षाकरिता   ३०% प्रमाणे ४६५०/- + ६७५ /- = ५३२५/-रूपये
३) २०२२-२३ तिसऱ्या वर्षाकरिता ३०% प्रमाणे = ४६५०/-रूपये 
४) २०२३-२४ चौथ्या वर्षाकरिता  १०% प्रमाणे = १५५०/-रूपये

विशेष भत्ता(महागाई भत्ता ) :

महाराष्ट्र शासनाने दर सहा  महिन्यांनी किमान वेतन कायदा १९४८ अंतर्गत महागाई भत्ता महाराष्ट्र शासन जाहीर करते त्या दराने सर्व कामगारांना महागाई भत्ता देण्यात येईल.सध्या जुलै २०२१ महिन्यात जाहीर करण्यात आलेला महागाई भत्ता ३२५/- रूपये आहे आणि जुलै २०२१ पासून जादा देण्यात आलेली रक्कम ६७५/- रुपये असे मिळून महागाई भत्ता १०००/- करण्यात आला आहे. 

बोनस :

१)२०२० या वर्षासाठी ३३०००/-
२)२०२१ या वर्षासाठी ३५०००/- +१०००/-
३)२०२२ या वर्षासाठी ३७०००/- +१०००/-
४)२०२३ या वर्षासाठी ४००००/- +१०००/- 

जादाचे १०००/- हे कंपनीच्या नफा तत्वावर आहेत.(कंपनीला  नफा झाल्यावर वरील रक्कम देण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे.) 

ग्रेड अपग्रेडेशन इनक्रिमेंट :

दोन्ही पक्षांद्वारे हे मान्य केले  की, एक वेळा श्रेणी वाढीची रक्कम प्रदान केली जाईल
खालील तक्त्यानुसार कामगार ग्रेड अपग्रेडेशन वाढीचा दर
 १) G1 ते G2 अपग्रेडेशन  ३०० रुपये 
 २) G2 ते G3 अपग्रेडेशन ४०० रुपये
 ३) G3 ते G4 अपग्रेडेशन ५०० रुपये

दिर्घ सेवापुरस्कार :

१) १० वर्ष सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.७५००/- वरून रु.९,०००/--करण्यात आला आहे .
२) १५ वर्ष सेवा कालावधीपूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.१२५००/- वरून रु.१४,०००/- करण्यात आला आहे .
३) २० वर्ष सेवा कालावधीपूर्ण करणाऱ्या कामगारांसाठी पारितोषिक रक्कम रु.२०,०००/-देण्यात येईल.

रात्रपाळी भत्ता :

रात्रपाळी भत्ता  हा प्रतिदिन  रु ३०/- वरून  प्रतिदिन रु.४०/- रूपये करण्यात आला आहे.

गुणवान पाल्य :

सर्व कामगारच्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी  गुणवान पाल्य योजने अंतर्गत 
१) १०वी आणि १२वी गुणवान पाल्यासाठी रु.५,०००/- वरून रु.७,५००/- करण्यात आली आहे .
२) पदवीधर, इंजिनिअरिंग आणि  M.B.B.S गुणवान पाल्यासाठी रु.१५,०००/- वरून रु.१७,५००/- करण्यात आली आहे .
३) राष्ट्रीय खेळासाठी रु.१०,०००/- वरून रु.१२,५००/- करण्यात आली आहे.

रजा :

हक्काची रजा (PL) : 

हक्काची रजेत १ ने वाढ करून एकुण १६ करण्यात आल्या आहे.
हक्काची रजा ५० दिवसापर्यंत साढवण्यात येणार आहेत .५० दिवसाच्या पुढील हक्काच्या रजेचे रोखिकरण पगारानुसार केले जाईल .

किरकोळ रजा (CL) :-

किरकोळ रजेत ३ ने वाढ करून एकुण ८ करण्यात आल्या आहे .

आजारपणाची रजा (SL):-

आजारपणाची रजा एकुण ४  पूर्वीप्रमाणे राहतील .

निवडणूक रजा :

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दिवशी पगारीसुट्टी देण्यात येतील .

मेडिकल रजा (हाॅस्पिटलायझेशन रजा ) :

सर्व कामगारासाठी मेडिकल रजा हि (कामगार स्वतः) MBBS/MD/MS सर्टिफाईड हॉस्पिटलमध्ये २४ तास अ‍ॅडमिट झाल्यापासून  डिस्चार्ज मिळेपर्यंत मेडिकल रजा लागु होईल असे मान्य करण्यात आले आहे .

ट्रान्सपोर्ट अलाऊन्स :

१ शिफ्ट, २ शिफ्ट , ३ शिफ्ट , आठवडा सुट्टी आणि पे हॉलीडे या दिवशी जर ट्रान्सपोर्ट सुविधा (बसेस) उपलब्ध नसेल त्या दिवसासाठी २.५०/-रुपये प्रति १ किलोमीटर वरून ३/- रूपये प्रति १ किलोमीटर प्रमाणे भत्ता (ट्रान्सपोर्ट अलाऊन्स) देण्याचे मान्य करण्यात आला आहे.

गणवेष :

गणवेषाचे प्रतिवर्ष जुलै महिन्यात दोन संच देण्याची मान्य करण्यात आले आहे तसेच वारंवारिता यापुढेही चालू राहील.

सेफ्टी शुज :

प्रतिवर्ष जुलै महिन्यात सेफ्टी शुज  देण्याचे मान्य करण्यात आले आहे तसेच वारंवारिता यापुढेही चालू राहील.

खेळ :

कामगारांसाठी भविष्यामध्ये खेळांना उत्तेजन देण्यामध्ये आपण विशेषत्वाने उत्सुक असून दरवर्षी स्पर्धा भरविल्या जातील व येणारा सर्व खर्च कंपनीतर्फे केला जाईल असे व्यवस्थापनेने प्रतिपादन केले आहे.

विवाहासाठी भेट :

कामगाराचे स्वतःचे लग्न असल्यास रु.२५००/- (दोन हजार पाचशे) गिफ्ट म्हणून आणि कंपनी प्रॉडक्टचे गिफ्ट देण्यात येईल.

मेडिक्लेम पॉलिसी :

कामगारांच्या कुटुंबातील चार व्यक्ति (स्वतः कामगार, त्याची पत्नी, आई, वडील किंवा दोन अपत्य / महिलांसाठी सासु-सासरे ) विमा रक्कम वार्षिक रु.२,००,०००/- रूपये (दोन लाख रुपये )  करण्यात आली आहे. 

या व्यतिरिक्त  रु.२,००,०००/-(दोन लाख) (IRDA च्या नियमा नुसार) गंभीर आजाराच्या बाबतीत वापरण्याचे मान्य केले आहे.

टर्म इन्शुरन्स :

सर्व कामगारांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढण्याचे मान्य करण्यात आले असून तसेच सर्व कामगार एक दिवसाचा पुर्ण वेतन मदत म्हणून देतील असे मान्य करण्यात आले आहे .

दिवाळी गिफ्ट :

कामगारांसाठी  दिवाळी सणानिमित्त गिफ्ट
Kider joy T8 -  २ नग, Nutella  190 gm  -२ नग, Rocher T16 -१ नग, Tic Tac Hanger - १ नग, K.s.b.c - T16 -२ नग, F.R.M- T12- १ नग दरवर्षी देण्यात येईल.

कौटुंबिक सांस्कृतिक महोत्सव (फॅमिली डे ) :

कामगारांना तसेच परिवारातील सदस्यांना (पती/ पत्नी,अपत्य )सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये  उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल.  

संघटना ऑफिस :

संघटनेच्या मासिक मिटींगसाठी तसेच संघटनेच्या इतर कामकाजसाठी सर्व सोयी युक्त असे नवीन ऑफिस देण्याचे मान्य केले आहे.  

      सदर करारावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब डेरे, सचिव महेश काटे, उपाध्यक्ष महेश लकडे, कार्याध्यक्ष शैलेश बोरकर, खजिनदार सौ.शितल शेंडे, सहसचिव संतोष गवळी, कार्यकारणी सदस्य दत्तात्रय गायकवाड, मनोज भोसले, सचिन पिंगळे, सौ.अर्पणा रंधवे, फरजाना शेख तसेच कंपनीच्या वतीने प्लँट हेड डॅनिएल पेरोटिनो, एच.आर हेड उमेश दुगानी, सीएफओ कुंदन पटेल, कंट्री एच.आर हेड फाबीओ, फायनान्स हेड प्रशांत पोतनीस, रिजन इंडिया रिवॉर्ड मॅनेजर जिमी गांधी, आय.आर. मॅनेजर रमेश हिरेमठ, वरिष्ठ कार्यकारी एच.आर योगेश मगदूम यांनी सह्या केल्या.

     सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्य प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली .