प्लास्टिक ओमनियम एम्प्लॉईज युनियन दशकपूर्ती सोहळा संपन्न

चाकण : चाकण येथील प्लास्टिक ओमनियम (Plastic Omnium) कंपनीच्या प्लास्टिक ओमनियम एम्प्लॉईज युनियन दशकपूर्ती (दहावा वर्धापन दिन) सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोरजी ढोकले आणि प्लास्टिक ओमनियम इंडिया चे कंट्री डायरेक्टर ग्यानेंद्रकुमार शर्मा आणि संघटनेचे प्रतिनिधी गणेश मराठे, राजेश देसाई, सम्राट मुंगसे, सचिन तांबे, सतीश मोरे, विजय जगदाळे, अभिजीत बुजरे व इतर सभासद यांच्या उपस्थितीत आनंदाने पार पडला. यावेळी संघटनेच्या दहा वर्षांच्या काळाची माहिती असणारे "संघर्षगाथा" या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये युनियनच्या दहावर्षाच्या काळातील वाटचाल याचा आढावा घेतला गेला व पुढील काळामध्ये कंपनी व्यवस्थापन आणि युनियन यांच्या मध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी ग्वाही कार्यक्रमामध्ये देण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे जनरल सेक्रेटरी अविनाश वाडेकर, उपाध्यक्ष राजुअण्णा दरेकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, कामगार नेते प्रकाशभाऊ हागवणे, महाराष्ट्र कामगार सेल उपाध्यक्ष योगेश जाधव, कंपनी व्यवस्थापनाकडून एच आर हेड संतोष राऊतजी, जनरल मॅनेजर अखिलजी सिद्धकी ,एच आर मॅनेजर बाळासाहेब ठाकरे आदी उपस्थित होते.