मुंबई : कामगार आयुक्त/अधिकारी यांनी प्रादेशिक कामगार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत नियमित आमच्या बैठका आयोजित कराव्यात जेणेकरून आमच्यातील संवाद वाढेल, अशी अपेक्षा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी मुंबईत असंघटित कामगारांना ई-श्रम कार्ड वितरीत करताना व्यक्त केली असे वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेने दिले आहे.
नाव नोंदणी वाढवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष प्रयत्नांबाबतही त्यांनी माहिती दिली. "आम्ही आमच्या सामायिक सेवा केंद्रांद्वारे नोंदणी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या मजुरांना तंत्रज्ञान विषयक ज्ञान नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एसएमएस सेवांची व्यवस्था करत आहोत. आम्ही प्रादेशिक भाषांमध्ये कॉल सेंटरची स्थापना केली आहे जेणेकरून ते मजुरांपर्यंत अधिक सुलभतेने पोहचतील. "
ते म्हणाले की ब्रिक्सच्या बैठकीतही आम्ही पुन्हा नमूद केले की आणि अस्थायी कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांची काम करण्याची स्थिती आणि रोजगाराच्या सुरक्षिततेबाबत नियम बनवण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, "त्यांना आवश्यक सामाजिक सुरक्षा मिळेल यासाठी आम्ही तरतूद करणार आहोत."
