कैलास वहन उद्योग प्रा.लिमि (Kailash Vahn Udyog Private Limited) येथे वेतन वाढ करार संपन्न

मरकळ : आळंदी-मरकळ रोड,धानोरे ता.खेड जि.पुणे येथील कैलास वहन उद्योग प्रा.लिमि (Kailash Vahn Udyog Private Limited) कंपनी व्यवस्थापन व राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांच्या दरम्यान  वेतनवाढ करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

  • कराराचा कालावधी दि.1 ऑगस्ट 2021 पासून तीन वर्षाचा करार झाला.

  • कामगारांना रुपये 9,000/- वेतनवाढ 

  • वेतनवाढ रक्कम रुपये 9,000/-  पाहिल्या वर्षापासून लागू 

    करारावेळी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राघव गुप्ता, कंपनीचे संचालक एच.के.अगरवाल, कंपनीचे सल्लागार अ‍ॅड.आर.एम निर्मल, कंपनीचे मुख्य अधिकारी (एच आर) एस.डी.साळुंके यांनी चर्चेत सहभाग घेतला तर कामगारांच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले कंपनीतील कामगार प्रतिनिधी शंकर गावडे, बाळासाहेब गावडे, संजय गावडे,बाळासाहेब चौधरी, पांडुरंग गावडे यांनी सहभाग घेतला 

     वेतनवाढ करार संपन्न झाल्यामुळे सर्व कामगारांनी पेढे वाटून, फटाके फोडून, गुलाल उधळून राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले व कंपनी संचालक, व्यवस्थापन यांचे आभार मानले. हा करार शांततेत पार पडल्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद होता यावेळी संघटनेचे पदाधिकारी अमोल घोरपडे, दिपक पाटील, करण भालेकर, दिनेश पाटील उपस्थित होते.