महागाई वर नियंत्रण न आल्यास भारतीय मजदूर संघाचा राज्यभर रास्ता रोकोचा इशारा

पुणे : मागील एक ते दिड वर्षां पासून करोना महामारी, लाॅकडाऊन मुळे संघटीत व असंघटीत कामगारांवर मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे. लाॅकडाउनचे कारण दाखवून अनेक मालकांनी कामगार कपात, वेतन कपात, महागाई भत्ता बंद करणे, वेतन वाढ करार लांबणीवर टाकणे, शाळा काॅलेज बंद असल्याने तसेच सर्वच ठिकाणी गर्दीचे कारण दाखवून आवश्यक सभा, समारंभवर मर्यादा आल्याने या क्षेत्रातील कामगारांना बेरोजगारीला  सामोरे जावे लागत आहे, त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या, सेवाच्या किंमती गगनाला भिडल्या असून पेट्रोल डिझेल, खाद्य तेल च्या किंमतीत प्रचंड वाढ होवुन सामान्य माणूस, कामगार मेटाकुटीस आला आहे. 

       जीवनावश्यक घटकांच्या बाजार मुल्यावर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन देवुन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकार ने सामान्य माणसाच्या तोंडाला पाने पुसली आहेत, केंद्र व राज्य सरकार ने महागाई नियंत्रणात न ठेवल्यास भारतीय मजदूर संघाच्या वतीने संर्पूण राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन प्रसंगी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी दिलेला आहे. 

    केंद्र व राज्य सरकार ने महागाई च्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे समोर दि ८ सप्टेंबर २१ रोजी निदर्शने करण्यात आली. सदर आंदोलनात पुणे जिल्हा मधील विविध क्षेत्रातील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी केंद्र व राज्य सरकार कडे खालील महत्वापुर्ण निवेदन निवासी जिल्हाधिकारी सौ.जयश्री कटारे यांना शिष्टमंडळ ने दिले आहे.

प्रमुख मागणी :

1) पेट्रोल, डिझेल व गॅस, खाद्य तेल अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करून दरवाढीला नियंत्रण आणा.

2) डिझेल, पेट्रोल अन्य वस्तू प्रमाणे जीएसटी च्या कक्षेत आणा.

3) अवाजवी नफाखोरी टाळण्यासाठी प्रत्येक वस्तूवर त्या वस्तूंचा उत्पादन खर्च छापण्यासाठी कायद्याने सक्ती करा.

4) राज्यातील घरेलू, बांधकाम, फेरीवाले, रिक्षावाले, टँक्सीचालक, माळीकामगार, पुजारी, भटजी, सोनार, कारागीर, शिंपी यासह असंघटीत क्षेत्रातील कामगारांना रू 10,000/- रक्कम अनुदान म्हणून द्यावी.

5) खाद्य तेल, डाळी, बाबतीत देश आत्मनिर्भर करण्यासाठी खाद्यपदार्थच्या किंमती वर नियंत्रण ठेवा.

6) सार्वजनिक उद्योगातील व खाजगी उद्योगातील कामगारांना महागाई च्या प्रमाणात मोबदला मिळावा. 

       सदर आंदोलनात प्रसंगी मागण्याचे निवेदन देण्यात आले, या प्रसंगी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल ढुमणे, जिल्हा सेक्रेटरी जालिंदर कांबळे, कोषाध्यक्ष अजेंद्र जोशी, संघटक विवेक ठकार, वीज उद्योगातील महाराष्ट्र वीज कंत्राटी  कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, औद्योगिक विभागाचे अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे महामंत्री महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     सदर आंदोलनात औद्योगिक, बॅंक ,संरक्षण , सुरक्षारक्षक, वीज उद्योग, कंत्राटी कामगार, महानगरपालिका, हाॅस्पीटल, विविध मंदिरातील सेवक उपस्थित होते. सदरचे आंदोलनवेळी कोविड मार्गदर्शक तत्त्वे पालन करण्यात आले.