आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करून आंदोलन !

कोल्हापूर : जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळी यांना (दि.६ सप्टेंबर २०२१) निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.  निवेदना बाबत बोलताना सुरुवातीस कॉ सुमन पुजारी यांनी सांगितले की, सध्या शासनाकडून कोविड-19 चे कामासाठी मोबदला दरमहा रुपये 1000/- दिला जात होता परंतु हा मोबदला अचानकपणे 1 सप्टेंबर पासून देणे बंद केले आहे.

जोपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून कोविड-19 प्रोत्साहन भत्ता  देण्याचा निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत आशा व गटप्रवर्तक महिला कोविड-19 संदर्भात कसलीही काम करणार नाहीत. परंतु काही अधिकारी आशा व गटप्रवर्तक महिलांना  प्रोत्साहन भत्ता बंद झालेला असूनही कोविड-19 संदर्भात कामे सांगत आहेत.

      याबाबत डॉक्टर योगेश साळी यांनी खुलासा केला की, आशा व गटप्रवर्तक महिलांना प्रोत्साहन भत्ता पुर्ववत मिळण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पत्र पाठवले आहे. तसेच ज्या कामाचा मोबदला आशा व गटप्रवर्तक महिलाना मिळत नाही ते काम जरी कोणत्याही अधिकाऱ्याने तुम्हाला सांगितल्यास ते करू नये आणि कोणी जबरदस्ती करीत असल्यास त्याबद्दल ची तक्रार आमच्याकडे करावी असे डॉक्टर योगेश साळी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

      यानंतर चर्चेमध्ये कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य वर्धनीचे काम डिसेंबर दोन हजार वीस पासून आशा व गटप्रवर्तक महिलांच्या कडून करूनच घेतले जात आहे. परंतु त्याचा काहीही मोबदला अद्याप दिलेला नाही. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की, आरोग्य वर्धनीचा मोबदला मागील फरकासहित लवकरच देण्यात येईल.

      तसेच सध्या आठ दिवसांमध्ये NHMकडे उपलब्ध रक्कम पाच कोटी 77 लाख रुपये आहे. त्यापैकी सर्वांना आशा व गटप्रवर्तक महिलांना एक महिन्याचे मानधन व रक्कम शिल्लक राहिल्यास आरोग्य वर्धनी चा लाभ देण्यात येईल. त्यांनी असेही सांगितले की एप्रिल 2021 पासून आजपर्यंत भारत सरकार कडून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जो निधी येणे आवश्यक होते तो अद्याप आलेला नसल्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांचे तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्व पगार व मानधन थकलेले आहे. तो निधी मिळाल्यानंतर तातडीने देण्यात येईल.

     यानंतर कोल्हापूर झेडपी समोर आंदोलन महिलांच्या मध्ये झालेल्या सभेमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की, जर कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून 23 तारखेच्या आत दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई न झाल्यास 23 सप्टेंबर पासून कोल्हापूर जिल्हापरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे असे युनियनच्या जनरल सेक्रेटरी सुमन पुजारी यांनी प्रत्येक पत्रक प्रसिद्धीस दिलेले आहे. 

     या आंदोलनाचे नेतृत्व कॉ शंकर पुजारी, कॉ सुमन पुजारी, कॉ विजय बचाटे, कॉ विशाल बडवे, वनिता खोंगे, लक्ष्मी पाटील, राणी लाड, पूजा लाड, अरुणा कांबळे,  संगीता देशमुख, संगीता पाटील, मुक्ता शेटे, राजश्री पाटील, सविता कांबळे, अंजली पडीयार विजया कांबळे,  संगीता पाटील, अनुजा माळी, निता बेले यांनी नेतृत्व केले.