चाकण,पुणे : म्हाळुंगे येथील लॉरियाल इंडिया प्रा. लिमि (L’Oreal India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियन,चाकण यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार दि.२० जुलै २०२१ रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :
सदर करार माहे १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३ अशा तीन वर्षाकरिता करण्यात आला.
कसल्याहि प्रकारच्या उत्पादनाशी निगडित पगारवाढ नाही.
सर्वांना समान पगार वाढ.
पहिल्या वर्षी - ५,०००/-
दुसऱ्या वर्षी - ५,१००/-
तिसऱ्या वर्षी - ४,८७१/-
वेतनातील फरक -
जानेवारी २०२१ पासुनचा फरक मिळणार आहे.
रात्रपाळी भत्ता -
रात्रपाळी भत्ता प्रतिदिन रु.१००/- देण्याचे उभयपक्षी मान्य केले आहे.
सेव्हन डे भत्ता -
सेव्हन डे भत्ता प्रतिमहिना रु.१,१५०/- देण्याचे उभयपक्षी मान्य केले आहे.
किरकोळ रजा -
किरकोळ रजेत १ ने वाढ करुन एकुण ८ करण्यात आल्या आहे.वर्षे अखेर शिल्लक किरकोळ रजेचा हक्काच्या रजेत समावेश करण्यात येणार आहे.
आजारपणाची रजा -
आजारपणाच्या रजेत १ ने वाढ करुन एकुण ८ करण्यात आल्या आहे.आजारपणाची रजा ३० पर्यत साठवण्यात येणार आहे.त्यापुढिल लॅप्स होणार आहेत.
हक्काची रजा -
प्रसूती तसेच गंभीर आजारपणामुळे कामगार हक्काच्या रजेस पत्रा ठरत नसेल तर त्याला ह्या कारणासाठी सरसकट १२ हक्काच्या रजा मिळतील असे उभय पक्षी मान्य करण्यात आले आहे. कोणत्याही रजा एकमेकांना जोडुन घेता येणार आहे.
पगारी सुट्टी -
पगारी सुट्टीत २ ने वाढ करुन त्या १३ केल्या आहेत.
पितृत्व रजा -
पितृत्व रजा २०२१ व २०२२ ला दोन आठवड्याची २०२३ला तीन आठवड्याची करण्यात आली आहे.
मातृत्व रजा -
मातृत्व रजा कायद्याप्रमाणे ६ महिन्याची आहे ती मिळेल, त्याचबरोबर त्यात १ महिन्याची वाढ करुन ती ७ महिन्याची मिळणार आहे.
गर्भपात रजा -
महिला कामगारांना ४२ दिवसांपर्यत मिळेल.
सात्वनादाखल रजा -
कामगाराच्या रक्ताच्या नात्यातील कोण मरण पावल्यास त्या कामगाराला ५ दिवसाची सात्वनादाखल रजा मिळणार आहे. (पती,पत्नी,आई,वडिल,सासु,सासरे,बहिण,भाऊ,मुले)
मुले दत्तक व सरोगसी रजा -
जर कर्मचाऱ्यांनी मुले दत्तक किंवा सरोगसी केली तर वरिल मातृत्व व पितृत्व रजेप्रमाणे रजा मिळतील.
कुटुंबनियोजन रजा -
कुटुंबनियोजनासाठी शस्त्रक्रिया केली असल्यास ४ दिवसाची कुटुंबनियोजन रजा मिळेल.
निवडणुक रजा -
लोकसभा व विधानसभेला पगारी सुट्टी मिळणार आहे.व स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या वेळी काहि वेळासाठी सुट मिळणार आहे.
सबॉटिकल रजा -
स्वतः च्या शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी २ महिने ते १ वर्षे विनापगारी अधिकृत रजा मिळणार आहे.यावेळी सर्व मेडिक्लेम चालु राहणार आहे.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन रजा -
भविष्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास परिस्थितीनुरुप योग्य निर्णय घेऊन रजा दिल्या जाणार.
रजेचे रोखिकरण -
९० च्या पुढिल १० हक्काच्या रजेचे रोखिकरण पुर्ण पगारानुसार केले जाईल.पण त्यासाठी मागील वर्षात कमीत कमी ७ हक्काच्या रजा उपभोगल्या पाहिजेत असे उभयपक्षी मान्य केले आहे.
भविष्य निर्वाह निधी व उपदान -
कायद्याप्रमाणे कामगारास दिला जाईल.
एल.टि.ए. -
१८१-२२० प्रत्यक्ष कामाचे दिवस भरल्यावर ७५%
१२०-१८० प्रत्यक्ष कामाचे दिवस भरल्यावर ५०%
१२०पेक्षा कमी प्रत्यक्ष कामाचे दिवस भरल्यावर ०% यानुसार एल टि ए मिळणार आहे.
प्रसुती व गंभिर आजारपणाच्या कारण असल्यास १००% प्रमाणे एल टी ए मिळेल असे उभयपक्षी मान्य केले आहे.
बोनस -
बोनस हा बेसिक व डि.ए.च्या ८.३३% प्रत्येक वर्षी देण्याचे उभयपक्षी मान्य केले आहे.
बस सुविधा -
सर्व कामगारांना बस सुविधा उपलब्ध राहील तसेच काहि बस स्टॉप वाढविण्यात आले आहे. बस सुविधेपोटी दरमहा किलोमीटरप्रमाणे कपात करण्यात येईल. ० ते १० किमी - रु.३००, १० ते १५ किमी - रु.३७५, १५ ते २० किमी - रु.४५०, २० ते २५ किमी - रु.५००, २५ किमी च्या पुढे रु.६०० अशी कटिंग असणार आहे.
जादा कामाचा मोबदला -
साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी जादा काम केले तर एकतर आॕफ किंवा मोबदला,
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे, गुढिपाडवा या दिवशी जादा काम केल्यावर तिप्पट रेटने व एक ऑफ,
इतर ९ पेड हॉलिडेला जादा काम केले तर डबल रेट व एक ऑफ मिळणार आहे.
कॅन्टीन -
कॅन्टीन सुविधांसाठी दरमहा १५% प्रत्येकी कपात केले जाईल.
गणवेष -
गणवेषाचे प्रतिवर्षं दोन संच देण्याची वारंवारिता यापुढेही चालू राहील. तसेच प्रतिवर्ष शिलाई खर्च ६००/-देण्याचे मान्य झाले आहे. या सुविधेव्यतिरिक्त प्रतिकरार म्हणजे तीन वर्षातुन एकदा १ टी शर्ट व एक जर्किंग देण्याचेही मान्य केले आहे.
खेळ -
कामगारांसाठी भविष्यामध्ये खेळांना उत्तेजन देण्यामध्ये उद्देशाने दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जातील व येणारा सर्व खर्च कंपनीतर्फे केला जाईल,यात भाग घेणाऱ्या खेळाडुला टी शर्ट देण्यात येतील.
कौटुंबिक सांस्कृतिक महोत्सव (फॅमिली डे) -
कामगारांना तसेच परिवारातील सदस्यांना (पती/पत्नी,अपत्य) सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल.
दसरा सेलिब्रेशन -
खंडेनवमिला दांडिया कार्यक्रम होईल.
मरणोत्तर सहाय्य निधी -
एखादा कायमस्वरूपी कामगार मृत पावल्यास कुटुंबीयांस मदत निधी म्हणून प्रत्येक कामगार दिड दिवसाचे पुर्ण वेतन मदत म्हणुन देतील आणि कामगारांची जी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम कंपनी देईल असे कंपनीने मान्य केले आहे.
वाचनालय -
नवनविन कामगार कायदे बदल कळण्यासाठी व इतर पुस्तके वाचण्यासाठी वाचनायल चालु करण्यात येईल.
विवाह भेट -
कामगाराला स्वतः च्या लग्नासाठी एका महिन्याच्या मुळ वेतन व फिक्स महागाई भत्ता याच्या ५०% अमाउंट विवाह भेट म्हणुन देण्यात येईल.तसेच स्वतः व स्वतःच्या मुला मुलीच्या लग्नासाठी कंपनी प्रॉडक्टचे गिफ्ट देण्यात येईल.
तक्रार निवारण पोर्टल -
तक्रार निवारण आॕनलाईन पोर्टल चालु करण्यात येईल.
पारितोषिक -
उत्तम हजेरी,सुरक्षा व सहभाग यासाठी तीन पारितोषिक दिले जातील. अवॉर्ड व रेकगनेशान पॉलिसी चालु करण्यात येईल.
शिष्यवृत्ती योजना -
उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वर्षाला ३ विद्यार्थ्यांना रु.८०,०००/- (रु.ऐंशी हजार) विना परतफेड देण्याची तरतूद करण्याचे मान्य केले आहे.
फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी -
कामगारांच्या कुटुंबासाठी (स्वतः कामगार, पति/ पत्नी,दोन अपत्य २५ वर्षे पर्यत ) विमा रक्कम वार्षिक रु.३,००,०००/- करण्यात आली आहे. प्रसुती खर्च ९०,०००/- करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रसुती वेळी जुळे किंवा तिळे झाले तरी सर्वांचा समावेश पाॕलीसीत होणार आहे. कोव्हिड साठी रुम रेंट कॅपिंग काढुन टाकण्यात आली आहे. होम केअरला ७५०० ते १५००० मिळणार आहे. डे-केअर डायलेसिस, केमोथेरपी, रेडिओलॉजी, डोळ्याची सर्जरी, किडणी, टॉन्सिलचा समावेश केला आहे. आयुर्वेदीय उपचारासाठी २५% खर्च मिळणार आहे.
आई वडिलांची मेडिक्लेम पॉलिसी -
आई वडिलांची मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात येईल.सुरवातीचा पुर्ण हप्ता कंपनी भरणार आहे व पुढिल १२ महिन्यात कामगारांच्या पगारातुन रिकव्हर केले जाणार आहे.
ग्रुप पर्सनल अँक्सीडेंट पॉलिसी -
२७ लाख करण्यात आली आहे.
ग्रुप टर्म इंशुरन्स पॉलिसी -
२७ लाख करण्यात आली आहे.
कंपनीत कामावर असताना अपघात झाल्यास मिळणारी रजा व इतर फायदे मिळण्यास कामगार पात्र राहतील
वैद्यकीय तपासणी -
कामगारांची दरवर्षी कंपनीत वैद्यकीय तपासणी केली जाईल.त्यात लग्ज फक्शन,लिव्हर प्रोफाईल,किडनी प्रोफाईल,युरिन,ब्लड शुगर, व्हिजन, ईसीजी, कोलेस्ट्राॕल,थायराॕईट, चेस्ट एक्सरे,टी.टी.इंजेक्शन ई,तपासण्या केल्या जाईल.तसेच त्या तपासणीत काही आढळले तर त्या पुढिल टेस्ट (सी.टी.स्कॕन,एम.आर.आय.स्ट्रेस टेस्ट,2D इको) या टेस्टचा खर्च कंपनी करणार आहे. कामगाराची दोन वर्षातून एकदा बोन डेन्सिटी टेस्ट कॕम्प कंपनीत घेण्याचे उभयपक्षी मान्य केले आहे. तसेच कुटुंबियांच्या आरोग्य तपासणीसाठी हॉस्पिटल टाईप केले जाईल.
इमरजन्सी ट्रान्सपोर्ट -
अचानक इमरजन्सी कारणासाठी वाहतुक सुविधा मिळेल.
वाढदिवस -
कामगारांच्या वाढदिवसानिमित्व १ किलोचा माॕजेनिज केक चे कुपन मिळणार आहे.
पाळणाघर भत्ता -
० ते ६ वर्षे यामधील बालकासांठी महिला कामगारांना ४५०० ते ५४०० पाळणाघर भत्ता प्रति महिना दोन अपत्यापर्यत मिळणार आहे.
जागतिक नफा विभागणी -
कंपनीच्या पॉलीसीनुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मागील वर्षी झालेल्या नफ्याच्या प्रमाणात रक्कम मिळणार आहे.यामध्ये दोन आठवड्यांची फिक्स वर्ड वाईज प्रॉफिट शेअरींग मिळणार आहे.
सॅलरी अॅडवान्स -
दर महिन्याला ८०,०००/- १२ महिन्याच्या परतफेडीवर प्रतिमहिना ८ कामगारांना सॅलरी अॅडवान्स मिळणार आहे.
दिवाळीत जादा कामाला आल्यावर प्रत्येक दिवसासाठी एक ५०० रु.गिफ्ट कुपन मिळणार आहे
दिर्घ सेवा पुरस्कार -
१५,२५ वर्षे व निवृत्तीच्या वेळी सर्टीफिकेट,पारितोषिक व योग्य भेट देण्याचे उभयपक्षी मान्य केले आहे.
मिठाई -
कामगारांसाठी दसरा सणानिमित्त १ किलो काजु कतली व दिवाळीत १ किलो सुकामेवा दरवर्षी देण्याचे उभयपक्षी मान्य केले आहे.
कंपनी प्रॉडक्ट -
दर तीन महिन्याला कंपनीचे प्रॉडक्ट १००० रुपयापर्यत व ८० % डिस्काउंट रेटने मिळणार आहे.
गंभीर आजारपणाच्या रजा -
गंभीर आजारपणाच्या रजेची स्किम लवकरात लवकर चालु करण्यात येईल.
कंपनी शेअर्स -
वेळोवेळी कंपनीने डिक्लेअर केलेल्या पद्धतीनुसार कामगार कंपनीचे शेअर्स घेण्यास पात्र राहणार आहे.
हजेरी भत्ता -
महिन्याचे पुर्ण दिवस हजर (रजा धरुन) असल्यावर १०% जास्त हजेरी भत्ता मिळणार आहे.
संघटना ऑफिस व वेळ -
संघटनेसाठी सर्व सोयी युक्त असे आॕफिस मिळणार आहे.व मासिक मिटिंगसाठी महिन्यातुन एकदा सर्व पदाधिकार्यांनां टाईम ऑफ मिळणार आहे. तसेच इतर संघटना कामासाठी वेळ दिला जाणार आहे. व त्या कामासाठी जर वाहनाची आवश्यकता लागल्यास उपलब्धतेनुसार वाहन सुविधाही मिळणार आहे.
सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याची भावना कामगारांनीही व्यक्त केली.
सदर करारासाठी मार्गदर्शन राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे व शिवाजीराव खटकाळे,उपाध्यक्ष राजूअण्णा दरेकर, सेक्रेटरी गणेश जाधव व इतर अनेक संघटनांनी केले.
सदर करारावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री.अविनाश वाडेकर, सचिव श्री.गणेश बोचरे, खजिनदार श्री.रवि साबळे, उपाध्यक्ष श्री.किशोर दाभाडे, कार्याध्यक्ष सौ.रेश्मा हांडे, सहसचिव श्री.सागर ठाकुर व श्री.अमित तुपे आणि कार्यकारणी सदस्य श्री.मुकुंद महाळुंगकर, श्री.पोपट बोत्रे, श्री.मनोज कंद, सौ.संगिता गायकवाड यांनी व कंपनीच्या वतीने प्लांट डायरेक्टर श्री.अरुण श्रवणकुमार, प्रॉडक्शन जन.मॅनेजर श्री.रणजित एडके, असि.जन.मॅनेजर एच.आर.श्री.संतोष कदम, सिनी.मॅनेजर एच.आर.श्री.अशोक देसाई, सिनी.मॅनेजर फायनान्स श्री.शिवांग गोयल, सिनी.मॅनेजर क्वालिटी श्री.सत्यासिंग, सिनी.मॅनेजर एच.आर.आशुतोष चतुर्वेदी, सिनी.मॅनेजर रुचा सानके, सेफ्टी सिनी.मॅनेजर अक्शिता शुक्ला, क्वालिटी असि.जन.मॅनेजर श्री.गणेश विचारे, मॅनेजर श्री.मयुर राउत व सचिन चावरे यांनी सह्या केल्या व साक्षीदार म्हणुन संघटनेच्या वतीने श्री.विनोद आल्हाट व गुलाब गायकवाड आणि कंपनीच्या वतीने श्री.गजानन नाईक व सौ.कार्तिकी बानगुडे यांनी सह्या केल्या.