किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा !

बारा बलुतेदार कामगार संघटनेचे अध्यक्ष सतिश शिंदे यांची मागणी

बुलढाणा : उद्योग, आस्थापना, MIDC क्षेत्रात या सर्व ठिकाणी कामगारांची अत्यंत महत्वाची भूमिका असते. कामगाराच्या श्रमाशिवाय कोणतेही उद्योग पूर्ण होत नाही. परंतु बहुतेक ठिकाणी काम करत असताना किमान वेतन दिले जात नाही याकरिता सर्व कामगारांना शासकीय नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे अशी मागणी बारा बलुतेदार कामगार संघटना यांच्या वतीने बुलडाणा जिल्हा सरकारी कामगार अधिकारी श्री आनंद राठोड यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्हयात विविध क्षेत्रातील कामगाराांना शासकीय नियमानुसार किमान वेतन मिळत नसल्याची चर्चा कामगारांमध्ये असुन, आपला रोजगार जाईल या  भीतीपोटी कामगार पुढे येत नाही असे निदर्शनास आले आहे. ८ तासापेक्षा जास्त काम करुनही तुटपुंज्या पगारात बोळवण होत आहे. सध्या कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालुन सेवा करणारा हॉस्पीटल मधील कामगार, सफाई कामगार, MIDC क्षेत्रात काम करणारा कामगार गॅस एजन्सी , पेट्रोल पंप, हॉटेल व्यवसाय, सर्व प्रकाराची आस्थापना, नगरपालिका क्षेत्रातील कंत्राटी कामगार, विदयुत मांडळाकडे काम करणारे कंत्राटी कामगार या सर्व ठिकाणी काम करणारे कामगार  यांना शासकीय  नियमानुसार किमान वेतन  दिले जात नाही. 

काही ठिकाणी जास्त रकमेवर सही घेवुन कमी पगार दिला जात आहे. तरी वरील सर्व कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी आपण शासकीय नियमानुसार किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी आपल्या स्तरावरुन करावी व कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी बारा बलुतेदार कामगार संघटनेचे नेते सतिश शिंदे यांनी केली आहे त्यावेळी शिवाजी जाधव, शेख जावेद, शेख मन्नान , शेख वजीर, अशपाक, गणेश जटाले उपस्थित होते.