केंद्रीय श्रम मंत्रालयाने व्याजदरांना मंजुरी दिल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या (PF) खात्यात लवकरच व्याज रक्कम जमा होऊ शकणार आहे.
केंद्रीय श्रम मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२०-२१ यासाठी ८.५ टक्के व्याज दर देणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या सात वर्षांतील हा सर्वांत कमी व्याज दर आहे. २०१२-१३ मध्ये सरकारने ८.५ टक्के व्याज दर (Interest Rate) दिला होता. २०१९-२० या आर्थिक वर्षात पीएफ सदस्यांच्या केवायसीसंबंधी बऱ्याच अनियमितता आढळल्याने व्याजाची रक्कम जमा होण्यास उशीर झाला होता. पण या वर्षी तसं होणार नाही वेळेत व्याजाची रक्कम जमा होऊ शकेल.
नोकरदार व्यक्तीच्या भविष्याची तरतूद म्हणून त्याच्या पगारातून ठराविक रक्कम दरमहा कापून पीएफ खात्यात त्याची कंपनी भरत असते.तसंच तेवढीच रक्कम ती कंपनीही खात्यात जमा करत असते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ठरावीक रक्कम मिळू शकते. या पीएफमधील रकमेवर सरकार व्याज देतं. ते व्याजदर सरकारकडून जाहीर केले जातात.
दरम्यान, सरकारने आता पीएफ खातं आधारसह लिंक करण्यास सांगितलं होतं. खातं आधारसह लिंक न केल्यास कंपनीकडून रक्कम खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे पीएफधारकांनी लवकरात लवकर खातं आधारसह जोडून घ्यावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे नागिरकांना पैसे काढण्यास अडचणी तयार होणार नाही.