कोविड मुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ESIC कडून पेन्शन

Pension from ESIC to the family of the worker who died due to covid

कोरोना माहामारीतुन सावरण्यासाठी ESIC ने कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ESIC कडे नोंदणीकृत असणारा कामगार जर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला तर त्याच्यावर अवलंबुन असणाऱ्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ हा पेन्शन स्वरुपात मिळणार आहे.

ही योजना २४ मार्च २०२० पासुन पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल आणि २३ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल. यासाठी सदर कामगार कोरोनाचे निदान झालेल्या दिवसाआधी ३ महिने ESIC कडे नोंदणीकृत असावा. तसेच निदान झाल्यावेळी तो नोकरीवर असावा व त्याने कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टच्या १ वर्ष अगोदर ७० दिवसांचे अंशदान भरलेले असावे. 

कोरोनाला बळी पडलेल्या विमीत कामगाराच्या पात्र कुटुंबियांना या योजनेचा फायदा मिळेल. अशी माहिती श्री हेमंतकुमार पांडे, उपनिदेशक प्रभारी, पुणे विभाग यांनी दिली.

पात्र कामगारांच्या कुटुंबियांना CRS-I हा अर्ज, मृत्यु प्रमाणपत्र व कोविड पॉझिटिव रिपोर्ट सहित आपल्या ESIC शाखे मध्ये जमा करावा असे आवाहन श्री. पांडे यांनी केले. अधिकची माहिती ESIC च्या संकेस्थळावर मिळेल.

ESIC विषयी विविध माहिती साठी : क्लिक करा