महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (Maharashtra Enviro Power Limited) वेतनवाढ करार संपन्न

रांजणगाव एमआयडीसी : कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे देशभर औद्योगिक व व्यापार विषयक मंदीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांची एकजूट व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (Maharashtra Enviro Power Limited)आणि महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कामगार संघटना यांच्या मध्ये २ जून २०२१ रोजी १२,०००/- रुपयांचा वेतनवाढीचा करार संपन्न झाला. 

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे: 

  • सदर करार तीन वर्षाचा आहे (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४) या तीन वर्षासाठी १२,०००/- रु. इन हॅन्ड रक्कम) व पी.एफ. ग्रॅज्युटी ही याव्यतिरिक्त एक्स्ट्रा असेल. ही विभागणी ५०% (बेसिक + डी.ए) आणि ५०% इतर अलाउंसमध्ये असेल. 

          पहिले वर्ष ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ = रु.४८००/-  
          दुसरे वर्ष ०१/०४/२०२२ते ३१/०३/२०२३ = रु.३६००/- 
          तिसरे वर्ष ०१/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ = रु.३६००/- 

  • पूर्वी कामगारांना मिळत असलेल्या १,५०,०००/- (दीड लाख रु.) मेडिक्लेम पॉलिसी मध्ये एक्स्ट्रा बफर पॉलिसी ३,००,०००/-(तीन लाख रु) देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

  • पूर्वी कामगारांना मिळत असलेल्या५,००,०००/-(पाच लाख रु.) डेथ क्लेम पॉलिसीमध्ये १,००,०००/एक लाख रु.) वाढ करून ती ६,००,००० / (सहा लाख रु.) करण्यात आली आहे तसेच अपंगत्व आल्यास १,००,०००/ (एक लाख रु.) ची तरतूद करण्यात आली आहे. 
  • पूर्वी कामगारांना मिळत असलेल्या २४ रजे मध्ये वाढ करून त्या २६ करण्यात आल्या. 

  • ड्रायव्हर कामगारांसाठी ओवर टाइम रूट मध्ये वाढ करण्यात आली.

  • ड्रायव्हर कामगारांसाठी मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्यात आली. 

  • सर्व कामगारांना इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले.

  • ड्रायव्हर कामगारांना कंपनीत पेट्रोल भत्ता म्हणून प्रती महिना ४००/ रु. देण्याचे मान्य करण्यात आले आहे. 

  • सन २०१७ ते २०२० पर्यंत थकीत असलेल्या बोनस पोटी ९,००,०००/- (नऊ लाख रु.) देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

  • तसेच यापूर्वीच्या करारामधील मिळत असलेल्या सोयी-सुविधा उदा. मॅरेज गिफ्ट, फॅमिली डे, गणवेश, सेफ्टी शूज, कॅन्टीन, ग्रॅज्युटी, पेड हॉलिडेज, दिवाळी गिफ्ट यापुढेही मिळत राहील. 

यावेळी कंपनी व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून आसिफ हुसेन सर (एम.डी), राकेश मिश्रा सर (जी.एम)  आशुतोष पत्राळे सर (एच.आर. हेड), तसेच संघटना प्रतिनिधी म्हणून अमर पडवळ (अध्यक्ष), अरुण घुले (जनरल सेक्रेटरी), सचिन धुमाळ (उपाध्यक्ष), जैनुद्दीन शेख (खजिनदार), सचिन पाटील (सह.सेक्रेटरी) यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

सदर वेतन वाढ करार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे, अरविंद श्रोती, केशव घोळवे (मा.उपमहापौर पिं.चि.महानगरपालिका) तसेच श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार (अध्यक्ष), मनोज पाटील ( जनरल सेक्रेटरी), रोहित पवार ( खजिनदार) व इतर पदाधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर संघटनेचे जनरल सेक्रेटरी अरुण घुले यांनी सांगितले कि, "माझे सहकारी कमिटीतील पदाधिकारी यांनी जिद्दीने व चिकाटीने केलेले कार्य व ठेवलेला विश्वास तसेच कामगारांनी दोन वर्ष ठेवलेला संयम आणि एकजूट आणि संघटनेवर ठेवलेला विश्वास तसेच श्रमिक एकता महासंघाचे वेळोवेळी मिळालेले अनमोल मार्गदर्शन यामुळे हा करार यशस्वीरित्या पार पाडता आला."

अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा