केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्तनदा मातांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे.(Centre Issues Advisory to State Governments/UTs to Encourage Work-from-Home for Nursing Mothers)
सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ (COVID-19) साथीच्या काळात काम करणा-या स्तनदा माता (nursing mothers) यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना / केंद्रशासित प्रदेशांना नर्सिंग मातांसाठी घरबसल्या काम (work from home) करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
नोकरदारांच्या हितरक्षणासाठी विशेषतः सध्याच्या महामारीच्या कालखंडात स्तनदा मातांच्या हितार्थ अजून एक निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्तनदा मातांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची सूचना मातृत्व लाभ (दुरुस्ती) कायदा २०१७ च्या कलम ५ (५) अन्वये जारी केली आहे.
या कायद्यानुसार स्तनदा मातेचे कामाचे स्वरूप हे घरी राहून करता येण्यासारखे असेल तर तिच्या रोजगारदात्याने (Employer) तिचे प्रसूती पश्चातच्या कालावधीचे लाभ कायम राखत नंतर घरून काम करण्याची परवानगी परस्पर सहमतीने द्यावी.
कोविड (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला महामारी दरम्यान नर्सिंग माता आणि त्यांच्या बाळांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना कोरोना विषाणूची लागण होण्यापासून वाचवण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना नियोक्तांना परवानगी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक नियमावली जारी केली आहे.
यानुसार सांगण्यात आले आहे कि, नियोक्त्यानी स्तनदा माता (nursing mothers) यांना बाळाच्या जन्माच्या तारखेपासून किमान एक वर्षाच्या कालावधीसाठी, वर्क फ्रॉम होम स्वरूपाची नोकरीची कामे करण्यास परवानगी देण्यात येईल.
कोविड दरम्यान नर्सिंग मातांचे संरक्षण करण्याबरोबरच कामाच्या स्वरूपामध्ये घरातून काम करणे सहजतेने लवचिकता प्रदान करेल त्याचबरोबर यामुळे नर्सिंग माता रोजगारामध्ये कायम राहण्यास सक्षम होतील.
छायाचित्र - इंटरनेट