हिताची ऑटोमोबाईल च्या कामगारांचे उपोषण सुरू

वांबोरी ता.धरणगाव येथील हिताचे ऑटोमोबाइल कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी शनिवारपासून कंपनीसमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे कायद्याने मिळणाऱ्या सोयी, सेवा सुविधा देण्यात याव्यात या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. कंपनीत परिसरातील शेकडो लोक काम करतात. यात कंत्राटदार मार्फत नियुक्त कामगार गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सेवा बजावत आहेत असे वृत्त दिव्यमराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.

कंपनीच्या माध्यमातून उत्पादन वाढीसाठी कंत्राटदाराकडून कामगारांना प्राधान्य दिले जाते, परंतु पगार वाढीसाठी कोणताही विचार केला जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षात कंपनी व कंत्राटदाराचे नाव बदलले असले तरी कामगार मात्र तेच आहेत. कुशल कामगारांच्या श्रेणीत मोडत असतानाही अकुशल कामगार शिर्डीचे श्रेणीचे वेतन दिले जाते. याशिवाय कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. व्यवस्थापन व कंत्राटदार हे दोघेही एकमेकांकडे बोट दाखवतात असेही कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी कंपनीच्या समोर उपोषण सुरू केले आहे सकाळी सात ते पाच वेळेस झालेल्या आंदोलनात चंदु रघुनाथ नन्नवरे, नरेंद्र मानसिंग पाटील, योगेश अशोक नन्नवरे, अविनाश युवराज सोनवणे, हेमंत दिगंबर सपकाळे, रवींद्र परशुराम नन्नवरे, लिलाधर दशरथ कोळी, धनराज रघुनाथ नन्नवरे, राहुल शंकर ठाकरे, जगदीश भीमराव सपकाळे आदी सहभागी झाले होते.