Extended deadline for linking Aadhar card to PF account
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने भविष्य निर्वाह निधी (PF) खात्याला आधार कार्ड (केवायसी) लिंक करण्यासाठी कार्यालयाने १ सप्टेंबर २०२१ पर्यंत ३ महिन्यांची मुदत वाढ दिली आहे.या निर्णयांमुळे देशातील लाखो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने आधार कार्ड युएएन (UAN) नंबरशी लिंक न करणाऱ्या कामगारांचे दि.१ जून २०२१ पासून भविष्य निर्वाह निधी खाते बंद करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे कामगार व कामगार संघटना मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
काही कामगार संघटनाच्या प्रातिनिधिनी केंद्रीय कामगार मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली व मुदत वाढ देण्याची मागणी केली.सरकारने यासंदर्भात १५ जून रोजी सर्क्यूलर जारी करत माहिती दिली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की UAN आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पूर्वीच्या परिपत्रक प्रमाणे :
कामगार/कर्मचारी याचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर सब्सक्रायबर्सच्या खात्यात एम्प्लॉयरचे योगदान थांबवले जाणार होते. सब्सक्रायबर्सचे UAN (Universal account number) आधारसह लिंक असणं आवश्यक आहे. EPFO ने Social Security code 2020 च्या सेक्शन 142 मध्ये बदल केला आहे. यामुळे ECR फाइलिंग प्रोटोकॉल बदलला होता.
UAN बरोबर आधार क्रमांक जोडणे बंधनकारक का करण्यात आले :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने सोशल सिक्युरिटी कोड सेक्शन 142 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या सेक्शनमध्ये असं म्हटलं आहे की असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांना जीवन विमा, आरोग्य विमा लाभ आणि भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी त्यांची ओळख किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आणि अवलंबितांची ओळख आधारद्वारे तपासली जाणे गरजेचे असे सांगण्यात आले होते.
नवीन परिपत्रक प्रमाणे बद्दल :
दि.१५ जून २०२१ रोजीच्या नवीन परिपत्रक प्रमाणे आता आधार क्रमांक यूएएनशी लिंक करण्याची डेडलाइन १ सप्टेंबर २०२१ करण्यात आली आहे.
आधारशी UAN जोडण्याची पद्धत :
- www.epfindia.gov.in वेबसाईट ओपन करा.
- Services मध्ये - For Employees वरती क्लिक करा.
- Member UAN/Online services वरती क्लिक करा.
- यानंतर UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा
- त्यानंतर Manage सेक्शनमध्ये KYC या पर्यायावर क्लिक करा
- याठिकाणी तुम्हाला EPF अकाउंटमध्ये आधारसह कोणती कागदपत्र जोडणं आवश्यक आहे ते दिसेल
- याठिकाणी आधारचा पर्याय निवडून आधार नंबर आणि आधारवरील तुमचं नाव टाइप करुन सर्व्हिसवर क्लिक करा
- यानंतर तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल आणि तुमचं आधार UIDAI डेटाशी व्हेरिफाय होईल
- तुम्ही दिलेली योग्य असल्यास तुमचं आधार EPF खात्याशी लिंक होईल.
दि.१५ जून २०२१ रोजीच्या EPFO चे नवीन परिपत्रक पाहण्यासाठी : क्लिक करा.