बिडी कामगारांना न्याय द्यावा - भारतीय मजदूर संघ

कोरोना महामारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधीत आदेशाचा चुकीचे अर्थ बिडी उद्योजकांनी लावल्या मुळे पुण्यातील ५००० पेक्षा जास्त महिला बिडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून गेल्या २ महिन्यपासुन बंद असलेले बिडी कारखाने त्वरित पुर्ववत सुरू करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने पुणे महानगर पालिका आयुक्त मा.विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

बीडी कामगांरांना लाॅकडाऊन कालावधीत मदत न मिळाल्याने अल्प उत्पन्न गटातील बिडी कामगारांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. बिडी वळण्याचे काम प्रामुख्याने महिला कामगार व घरातुनच चालत असल्याने त्यांना काम मिळणे आवश्यक आहे.  पुढील दोन दिवसात बिडी कामगारांना काम न मिळाल्यास  आंदोलन  करण्याचा इशारा भारतीय मजदूर संघांने दिला आहे, असे अखिल भारतीय बीडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस  उमेश विस्वाद व  कंत्राटी कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.