Tata Steel company announced a big help for the employees
टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वयाच्य साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन देण्याचा निर्णय कपंनीने घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही ६० वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन दिले जाणार आहे.
याबरोबरच कंपनीकडून निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टाटा स्टील व्यवस्थापनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की,कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या मदतीसाठी सर्वतोपरी पुढाकार घेत आहे. यामुळष कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याचे भविष्य उत्तम होईल.
यापूर्वी टाटा यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचललीत आणि एक आदर्श घालून दिला आहे. कोविडच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.