कंपनीने कर्मचारी यांच्या साठी कोरोना काळामध्ये जाहीर केली मदत

कोरोना काळामध्ये अनेक कंपन्या कर्मचारी यांची काळजी घेण्यासाठी पुढे येत आहेत. याप्रमाणे सिमेन्स इंडिया (Siemens India) कंपनीने देखील त्यांच्या कर्मचारी यांच्या साठी कोविड-१९ महामारी विरुद्ध लढण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सिमेन्स इंडियाने कोविड-१९ च्या विरोधात त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी (COVID-19 Care and Employee Well-Being ) काही उपाययोजनांची घोषणा केली आहे. 

  • कोविड-१९ मध्ये आपला जीव गमावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी कर्मचाऱ्याचा एका वर्षाच्या पगाराव्यतिरिक्त २५ लाख रुपये.

  • शिवाय मुलांची शालेय फी आणि कुटुंबातील सदस्यांचा वैद्यकीय विमा दिला जाईल. 

  • कोविड-१९ आजारामध्ये अतिरिक्त १० दिवस रजा.

  • व्यतिरिक्त सिमेन्स कंपनी त्यांच्या कर्मचारी व कुटुंबियांच्या लसीकरण देखील करेल.

“या कठीण आणि अपवादात्मक परिस्थितीत समाज आणि आमच्या कर्मचार्‍यांच्या हितासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. आम्ही या कठीण वेळी प्रत्येक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला पाठिंबा देत राहू. यासाठी कंपनी शक्य ते प्रयत्न करीत आहे", असे सिमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथूर यांनी सांगितले.