नमस्कार कामगार बंधू,भगिनींनो कामगार नामा घेऊन येत आहे नावीन्यपूर्ण सदर "कामगार नामा विविध योजना माहिती". या मध्ये सर्व शासनाच्या विविध योजना यांच्या बद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सदरचा मूळ उद्देश प्रत्येक कामगाराला शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत, त्याचा फायदा काय, त्याचा लाभ कसा घ्यावा हि माहिती उपलब्ध करून देणे.
कामगारांनी तसेच कामगार संघटनांनी त्यांच्या सर्व कामगार सदस्यांना शासनाच्या विविध योजना यांची माहिती व लाभ मिळवून दिल्यास कामगार यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडू शकतो.
योजना नाव - Pradhan Mantri Suraksha Bima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
योजनेचे स्वरूप :
या योजनेत वर्षभारासाठी वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण राहील ज्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल. यात मृत्यूसाठी संरक्षण देण्यात येईल
या योजनेचा मिळणारा लाभ :
१.मृत्यू - रु. २ लाख
२. दोन्ही डोळे / दोन्ही हात / दोन्ही पाय संपूर्णपणे गमावणे अथवा एका डोळ्याची नजर / एक हात / एक पाय गमावणे - रु. २ लाख
३. एका डोळ्याची नजर / एक हात / एक पाय संपूर्णपणे गमावणे - रु. १ लाख
या योजनेत कुणाला सहभागी होता येईल :
वर्ष १८ ते ७० या वयोगटातील सहभागी बँकातील सर्व बचत खातेधारक या योजनेसाठी पात्र राहतील. एकाच वेळी अनेक बँकात खाते असणार्या ग्राहकाला फक्त एकाच बचत खात्यामार्फत या योजनेत सहभागी होता येईल.
या योजनेतील सहभागी ग्राहकावरील जीवन सरंक्षण (विमा) केव्हा संपुष्टात येते :
- जन्म तारखेनुसार वय वर्ष ७० झाल्यावर (जी जवळची जन्मतारीख असेल).
- बचत खात्यात अपेक्षित शिल्लक नाही म्हणून आणि जीवन विमा प्रीमियम भरण्याच्या असमर्थेत.
- जर सदस्य हा एकापेक्षा जास्त बचत खात्यामार्फत या योजनेत सरंक्षित असेल तर, अश्यावेळी जीवन विमा कंपनीला असे अनेक प्रीमियम प्राप्त झाले तर फक्त एकाचेच विमा संरक्षण मिळेल आणि अन्य प्रीमियम परत केले जाणार नाहीत.
ज्या खातेदाराने नोदणी अर्ज भरला आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ कोण घेऊ शकतो :
ज्या खातेदाराने नोदणी अर्ज भरला आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ नामनिर्देशित व्यक्तीस मिळेल, आणि जर नामनिर्देशन केले नसेल तर कायदेशीर वारसास मिळेल.
क्लेमची किंमत कशा स्वरुपात दिली जाईल :
अपंगत्वाचा क्लेम खातेधारकाच्या बँक खात्यात भरला जाईल. मृत्यूचा क्लेम नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसाच्या खात्यात जमा होईल.
सर्व कामगार बंधू,भगिनींनी या योजेमध्ये दरवर्षी स्वतः व सर्व कुटुंब यांचा विमा प्रत्येकी रु.१२/- मध्ये काढावा.