महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त श्रमकल्याण युग मासिकाचे प्रकाशन कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंघल, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कामगार उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये करण्यात आले होते.
अंकामध्ये काय आहे -
श्रमकल्याणयुग मासिकामध्ये शासनाचे जी.आर., विविध लाभ योजनांची माहिती, वेळोवेळी होणारे बदल, कामगार विभागाच्या सर्व मंडळांची माहिती जसे घरेलु कामगार मंडळ, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांची असणार आहे तसेच कथा, कविता, माहितीपर लेख व अन्य माहिती असणार आहेत. या अंकाद्वारे घरबसल्या शासन उपक्रम कळणार आहेत.
अंक कसा मिळवावा -
अंकाची वार्षिक वर्गणी रु.३११/- भरून नोंदणी करता येईल त्यानंतर दर महिन्यास १ असे एकुण १२ अंक घरपोच मिळणार आहेत.
अंक मिळवणे व नोंदणी करिता -
श्रमकल्याणयुग मासिक नोंदणी व मिळवण्याकरिता तुमच्या भागातील कामगार कल्याण केंद्र संचालक / प्रमुख यांच्याशी संपर्क करा.
अंक नोंदणी करताना संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (ज्यावर मासिक अंक पोहोचविला जाईल), पिन कोड नं, मोबाइल नंबर याची माहिती देणे महत्वाचे आहे.