कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आंध्र प्रदेश राज्याने नुकतीच कोरोना बाधितांना मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच धर्तीवर राज्यात ही रूग्णांना निःशुल्क सेवा बजावण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेतर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे असे वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यात सर्वसामान्य जनतेचा पैशांच्या अभावामुळे हाल होत आहेत. किंबहुना हजारो रुग्णांच्या मृत्यूत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे हि गैरसोय दूर करून राज्यातील सहकारी व खासगी दवाखान्यात कोरोना बांधीत रूग्णांना मोफत उपचार देण्यात यावे, या आशयाचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यात आले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचा जळगाव जिल्हाध्यक्ष अशोक राठोड, धर्मराज बागुल, वसंत मारसाले, गौतम जाधव, स्वप्निल जाधव, साईदास गोलैत व मुकेश नेतकर आदी उपस्थित होते.