मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) कंपनीने कोरोना काळामध्ये कर्मचारी करिता जाहीर केली कोविड प्रोटेक्शन पॉलिसी

मॅनकाइंड फार्माने मृत कर्मचार्‍यांच्या कुटूंबासाठी कोविड संरक्षण धोरण सुरू केले (Mankind Pharma launches COVID protection policy to support families of deceased employees)

मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) कंपनीने कर्मचार्‍यांच्या कुटूंबासाठी कोविड संरक्षण धोरण आणले आहे. या नवीन धोरणानुसार कोरोना आजारामध्ये आपल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचा विचार करीत असल्याचे मॅनकाइंड फार्मा यांनी एका निवेदनात म्हटले आहे. अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

कोविड प्रोटेक्शन पॉलिसी अंतर्गत कंपनी :

  • मृत कर्मचारी यावरती अवलंबित असणाऱ्या व्यक्तीला कर्मचारीच्या शेवटच्या काढलेल्या एकूण वार्षिक पगाराच्या पाच वर्षाची रक्कम देणार आहे (जास्तीत जास्त मर्यादा ५० लाख रुपये राहील.)

  • त्याशिवाय, प्रत्येक कर्मचाऱ्यास कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स (EDLI) योजनेत समाविष्ट केले जाईल आणि कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कायदेशीर नामनिर्देशित व्यक्तींना ७ लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.

  • तसेच कर्मचारी निधनानंतर तीन वर्षांपर्यंत ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कुटुंबियांना वैद्यकीय विमा देण्यात येईल.

"आम्हाला आशा आहे की हे एकत्रित समर्थन मंजूर झाल्याने मृत कर्मचार्‍यांच्या शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांना आर्थिक ओझे दूर करण्यास मदत होईल. कंपनी आपल्या कर्मचार्‍यांशी वचनबद्ध आहे आणि त्यांना आपली मालमत्ता मानते आणि सर्व शक्य मार्गाने त्यांची काळजी घेण्याचा आमचा हेतू आहे." मॅनकाइंड फार्माचे कार्यकारी अध्यक्ष आरसी जुनेजा म्हणाले.

मॅनकाइंड फार्मा जवळपास १४,००० लोकांना रोजगार देते.