चाकण : म्हाळुंगे, चाकण औद्योगिक वसाहतीतील लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी, कोविड १९ या महामारीच्या काळात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या समाजभावनेतुन २७४ कामगारांनी प्रत्येकी रु.१०००/- प्रमाणे गोळा करून एकुण रक्कम रु.२,७४,०००/-(दोन लाख चौत्याहत्तर हजार) जमा झाले .
त्यातील रु.१,३७,०००/- पी.एम.केअर (PM Cares Fund) फंडासाठी पगारातुन कट करुन देण्यात आले.तेवढेच पैसे कंपनीनेहि पी.एम.केअर फंडासाठी दिले व उरलेले १,३७,०००/- मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Ministers Relief Fund) यासाठी देण्यात आले.
यावेळी लॉरियाल कामगार संघटनेचे अविनाश वाडेकर, किशोर दाभाडे, रेश्मा हांडे, गणेश बोचरे, रवि साबळे, सागर ठाकुर, अमित तुपे, मुकुंद महाळुंकर, पोपट बोत्रे, मनोज कंद व सांगिता गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सामाजिक कार्यात केलेल्या मदतीसाठी आपल्या सर्व कामगारांचे व व्यवस्थापनाचे संघटनेचे अध्यक्ष अविनाश वाडेकर यांनी आभार मानले.